Marathi News> भारत
Advertisement

जावई आहेत 'या' गावाची शान, काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या

काही गावं अशी असतात ज्याचा इतिहास हा अद्भूत करणारा असतो. 

जावई आहेत 'या' गावाची शान, काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या

Village Story: देशात आणि परदेशात अशी अनेक ठिकाणं असतात जेथे काही रहस्यही असतात तर काही गावं अशी असतात ज्याचा इतिहास हा अद्भूत करणारा असतो. त्याचप्रमाणे आपल्या देशातही काही गावेही आहेत जी त्यांच्या कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. भारतात असे एक गाव आहे जिथे 40 हून अधिक जावई असणारी घरे आहेत आणि त्यामुळेच या गावाचे नाव 'दामादनपुरवा' पडले म्हणजे ज्यात 'दामाद' असलेलं गाव. 

70 पैकी 40 घरे जावईंची आहेत

कानपूरच्या या गावात सुमारे 500 लोक राहतात. हे गाव अकबरपूर तहसील परिसरात वसलेले असून येथे सुमारे 70 घरे आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 70 घरांपैकी 40 हून अधिक घरे ही जावयांची आहेत. येथे राहणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानूसार या गावातील राणीचे 1970 मध्ये लग्न झाल्यानंतर त्यांचे पती सावरे कथेरिया हे त्यांचा सासरी म्हणजेच त्यांच्या बायकोच्या घरी राहू लागले. 

इतिहास काय सांगतो?

प्रत्यक्षात सावरे कथेरिया यांच्यासाठी जागा कमी असताना त्यांना गावाजवळ जमीन देण्यात आली. राणीच्या पतीनंतर अनेक मुलांनी या गावातील मुलींशी लग्न केले आणि आधी जावई झाले आणि नंतर येथे जमीन घेऊन राहू लागले. येथून ही परंपरा वाढू लागली आणि 2005 पर्यंत या गावात जावयांची एकूण 40 घरे बांधली गेली. येथील सर्वात वयस्कर जावई 78 वर्षांचे आहेत.

ही परंपरा अजूनही सुरू आहे. या काळातील पुरूष हे येथे जावई म्हणून या गावात येऊन स्थायिक (सेटल डाऊन) होतात.  

Read More