Marathi News> भारत
Advertisement

या 5 फ्रंटलाइन शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 वर्षात 281 टक्के रिटर्न

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गानंतरही शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना जबरजस्त कमाई करून दिली आहे. 

या 5 फ्रंटलाइन शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 वर्षात 281 टक्के रिटर्न

मुंबई : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गानंतरही शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना जबरजस्त कमाई करून दिली आहे. याच दरम्यान बाजाराने आपली उच्चांकी गाठली. 1 वर्षात गुंतवणूकदारांनीही चांगली कमाई केली आहे. या तेजीमध्ये दिग्गज शेअर्सचे मोठे योगदान राहिले आहे. फ्रंटलाइन शेअर्सने गुंतवणूकदारांना 4 पट परतावा दिला आहे. अशा 5 स्टॉकची माहिती घेऊया

TATA STEEL
टाटा स्टिलने 1 वर्षात गुंतवणूकदारांना 281 टक्के रिटर्न दिले आहे. दरम्यान, शेअरचा भाव 360 रुपये वाढून 1365 रुपयांवर पोहचला आहे. 1370 रुपये स्टॉकसाठी 1 वर्षाचा उच्चांक आहे.

fallbacks

JSW STEEL
जेएसडब्लु शेअरनेही गुंतवणूकदारांचा खिसा चांगलाच भरला आहे. रुटॉकनेदेखील 1 वर्षात 235 टक्के रिटर्न दिला आहे. दरम्यान शेअरचा भाव 215 रुपयांनी वाढून 721 वर पोहचला आहे. 773 रुपये या शेअरचा उच्चांक आहे.

fallbacks

TATA MOTORS
ऑटो सेक्टरमध्ये दिग्गज स्टॉक असलेला टाटा मोटार्सने 1 वर्षात167 टक्के रिटर्न दिला आहे. 1 वर्षात शेअरची किंमत 106 रुपयांनी वाढून 284 रुपये इतकी झाली आहे. 

fallbacks

GRASIM INDUSTRIES
ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने एका वर्षात 157 टक्के रिटर्न दिला आहे. दरम्यान शेअरची किंमत. 600 रुपयांनी वाढून 1532 रुपयांवर गेली आहे. 

fallbacks

SBI
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयनेदेखील गुंतवणूक दारांचे खिसे  भरले आहेत. 1 वर्षात या शेअरने 125 टक्के रिटर्न दिला आहे. वर्षभरात शेअरची किंमत 189 रुपयांनी वाढून 425 इतकी झाली आहे.

fallbacks

Read More