Marathi News> भारत
Advertisement

१५ ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरू होतील, चित्रपट सुरू होण्यापूर्वी 'हे' दाखवणे बंधनकारक

कोरोनाव्हायरस  (Coronavirus) साथीच्या आजारामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली देशातील सिनेमागृह ५० टक्के क्षमतेसह १५ ऑक्टोबरपासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

१५ ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरू होतील, चित्रपट सुरू होण्यापूर्वी 'हे' दाखवणे बंधनकारक

मुंबई : कोरोनाव्हायरस  (Coronavirus) साथीच्या आजारामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली देशातील सिनेमागृह ५० टक्के क्षमतेसह १५ ऑक्टोबरपासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी दिली. त्यांनी चित्रपटगृहांसाठी मानक कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर केली.

सिनेमागृहांसाठी नियम आणि अटी

आपल्या निवासस्थानी पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले, ५० टक्के सिनेमागृह सुरू करण्यास १५ ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात येईल. मास घालणे आणि प्रेक्षकांमधील आसन अंतर ठेवणे देखील अनिवार्य असेल. ते म्हणाले, 'गेल्या सात महिन्यांपासून सिनेमा घरे बंद आहेत. ते आता १५ ऑक्टोबरपासून उघडतील. आम्ही लोकांच्या सुरक्षिततेसाठी एसओपी तयार केला आहे. ते म्हणाले, '५० टक्के लोकांना सिनेमाच्या घरात बसण्याची परवानगी असेल. खुर्ची सोडण्याची व्यवस्था केली जाईल. मास अनिवार्य असतील. तसेच सॅनिटायझर आवश्यक आहे.

जनजागृतीसाठी एक मिनिटाचा चित्रपट

जावडेकर म्हणाले, कोरोनापासून बचाव करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी एक मिनिटांचा चित्रपट दाखविणे किंवा घोषणा करणे बंधनकारक असेल. ते म्हणाले, 'पहिला सिमेनाचा शोचा कार्यक्रम संपल्यानंतर संपूर्ण सभागृह स्वच्छ केले पाहिजे, त्यानंतरच दुसरा शो सुरू होईल. एकाच स्क्रीनमध्ये तिकिट बुक करण्यासाठी अधिक विंडो उघडल्या पाहिजेत. ऑनलाईन तिकीट बुकिंगला सर्वत्र प्रोत्साहन मिळेल. पॅक केलेले अन्न मिळेल. त्यांनी आशा व्यक्त केली की एसओपीनुसार आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. लोक १५ ऑक्टोबरपासून थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहू शकतील.  

Read More