Marathi News> भारत
Advertisement

प्रत्यक्षात असा आहे चंद्र! चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना टिपलेला पहिला फोटो ISRO ने केला शेअर

चंद्राची पहिली झलक पहायला मिळाली आहे. चांद्रयान 3 ने टिपलेला चंद्राचा फोटो  ISRO ने  शेअर  केला आहे.

प्रत्यक्षात असा आहे चंद्र!  चांद्रयान 3 ने  चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना टिपलेला पहिला फोटो ISRO ने केला शेअर

First Look of Moon Captured by Chandrayaan 3 :  लहान मुलांच्या कल्पना विश्वात, कवींच्या कवितेत चंद्राला विशेष स्थान आहे. अनेक प्रेमवीर आपल्या प्रेयसीची तुलना चंद्राशी करतात. प्रत्यक्षात मात्र, चंद्र कसा आहे कुणीच पाहिलेले नाही. आता मात्र, हा चंद्र कसा दिसतो. हे संपूर्ण जगाला पाहता येणार आहे. कारण, चांद्रयान 3 ने  चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चंद्राचे फोटो टिपले आहेत. चंद्राचा पहिला फोटो ISRO ने  शेअर   केला आहे. चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा पार पडला. यावेळी ही चंद्राची पहिली झलक पहायला मिळाली आहे. 

चंद्राची पहिली झलक

5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी चांद्रयान-3  चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.  लूनर ऑर्बिट इंजेक्शनच्या (Lunar Orbit Injection - LOI) माध्यमातून  चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत आणण्याची  प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे.  चांद्रयान-3  चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चंद्राची छायाचित्रे टिपली आहेत. याचा 45 सेकंदचा व्हिडिओ ISRO ने ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. 14 जुलै रोजी चांद्रयान-3 हे दिशेने झेपावले आहे.  

भारत इतिहास घडवण्यासाठी सज्ज

1 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 नं पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले. यानंतर  आता  चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. आता चांद्रयान-3 चंद्राभोवती परिभ्रमण करत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचणार आहे.  चांद्रयान 3 चंद्राभोवती दीर्घ वतुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालत  23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. या दरम्यान चांद्रयान 3 चंद्राभोवती 4 कक्षेत परिक्रमा पूर्ण करणार आहे.

चंद्राच्या कक्षेत प्रवेश करतानात चांद्रयान-3 ने चंद्राची पहिली झलक पाठवली आहे. चंद्राचा सफेद रंगाचा खडकाळ पृष्ठभाग ISRO ने  शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे. यामुळे   23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चांद्रयान- 3 जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर प्रवेश करेल तो क्षण भारतासाठी अभिमानाचा क्षण असेल. चांद्रयान- 3  चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर तिथेल प्रत्यक्षात दृष्य कसे असेल हे पाहण्याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. चांद्रयान- 3  हे नियोजीत प्रोग्रामनुसार विना व्यत्यय काम करत आहे. सर्व गोष्टी या अपेक्षेप्रमाणे घडत आहेत. यामुळे चांद्रयान- 3 मोहिमेत सहभागी असलेल्या ISRO च्या टीममध्ये वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.  इस्रोचे मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क चांद्रयानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे.  

 

Read More