Marathi News> भारत
Advertisement

क्रिप्टोकरंन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा क्रेझ वाढतोय; बिटकॉइनला ठरतंय नव्या युगाचं सोनं

भारतातील गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूकीसाठी क्रिप्टोकरंन्सीची क्रेझ  वाढताना दिसतेय. गुंतवणूकदार याला नवीन युगाचे सोने मानायला लागले आहेत

क्रिप्टोकरंन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा क्रेझ वाढतोय; बिटकॉइनला ठरतंय नव्या युगाचं सोनं

नवी दिल्ली : भारतातील गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूकीसाठी क्रिप्टोकरंन्सीची क्रेझ  वाढताना दिसतेय. गुंतवणूकदार याला नवीन युगाचे सोने मानायला लागले आहेत. जगभरात क्रिप्टोकरंन्सी घेणाऱ्यांमध्ये भारतीयांचा पहिला क्रमांक लागतो.

भारतीय कुटूंबियांमध्ये 25000 टनाहून अधिक  सोने आहे. क्रिप्टोकरंन्सीमधील भारतीयांची गुंतवणूक 20 कोटी डॉलरहून 40 कोटी डॉलरवर पोहचली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक क्रिप्टोकरंन्सीमधील भारतीयांच्या गुंतवणूकीबाबत सकारात्मक नाही. त्यामुळे RBI कडून क्रिप्टोकरंन्सीवर बंदी आणण्याचा विचार सुरू आहे.

देशात 1.5 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूकदार डिजिटल कॉइनची खरेदी विक्री करीत आहे. अमेरिकेत क्रिप्टोकरंन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या 2.3 कोटी आहे. इंग्लंडमध्ये क्रिप्टोकरंन्सी साधारण 23 लाख जणांनी गुंतवणूक केली आहे. भारतीय गुंतवणूकदार लवकरच अमेरिकेच्या गुंतवणूकदारांना मागे टाकणार आहेत.

तज्ज्ञांच्या मते 18 ते 35 वयोगटातील गुंतवणूकदारांमध्ये क्रिप्टोकरंन्सीची क्रेझ अधिक आहे.

Read More