Marathi News> भारत
Advertisement

वाईन शॉप सुरु झाल्याने तळीराम आनंदी, भररसत्यात दारुची पूजा

सध्या या व्हीडिओची सोशल मीडियावर फार चर्चा सुरु आहे.    

वाईन शॉप सुरु झाल्याने तळीराम आनंदी, भररसत्यात दारुची पूजा

मुंबई : देशातील विविध राज्यात आता कोरोनाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार वाईन शॉपही पुन्हा सुरु झाले आहेत. वाईन शॉप सुरु झाल्याने तळीरामांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुन्हा नेहमी प्रमाणे दररोज मद्य प्यायला मिळणार असल्याने तळीराम आनंदी आहे. पण एका मद्यप्रेमीने हा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. या तळीरामाने चक्क दारुची पूजा केली आहे. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ एएनआयने या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. (The alcoholic worshiped the liquor as the wine shop opened video goes viral)

एएनआयने ट्विट केलेला हा व्हीडिओ तामिळनाडूतील आहे. तामिळनाडूत सोमवारपासून वाईन शॉप पुन्हा सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यानुसार दुकानं सुरु करण्यात आली. यामुळे दुकानासमोर तळीरामांनी एकच गर्दी केली.

या तळीरामाने दुकानासमोर दिवा लावला. त्यानंतर त्याने दारुच्या 2 बाटल्या खरेदी केल्या. त्या बाटल्या अग्निदेवेतेसमोर ठेवल्या. त्यानंतर पठ्ठ्याने दारु पिण्याची पोज दिली. हा सर्व प्रकार पाहून आणखी एक तळीराम आनंद द्विगुणित करण्यासाठी त्याच्यासोबत जोडला गेला. सध्या या व्हीडिओची सोशल मीडियावर फार चर्चा सुरु आहे.  

दरम्यान तामिळनाडूत 35 दिवसानंतर 27 जिल्ह्यांमध्ये सलून, पार्क आणि वाईन शॉप सुरु झाले आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी निर्बंध शिथिल केले होते. तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन कायम आहे. मात्र काही निर्बंध शिथिल केले गेले आहेत. त्यानुसार 21 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे धार्मिक आणि पर्यटन स्थळी तेथील नागरिकांना जाता येणार नाही. तसेच सार्वजनिक वाहतून व्यवस्थाही बंद असणार आहे. 


संबंधित बातम्या : 

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, नारायण राणेंची लागणार वर्णी?

PMSBY | फक्त 12 रुपये आणि 2 लाखांचा विमा, जाणून घ्या अधिक माहिती

Read More