Marathi News> भारत
Advertisement

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर बस दरीत कोसळली; 10 ठार

जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. गोळीबारानंतर बस दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.   

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर बस दरीत कोसळली; 10 ठार
Updated: Jun 09, 2024, 09:16 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसवर गोळीबार केला आहे. रियासी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. हे सर्व भाविक शिवखोडी मंदिरात दर्शनासाठी निघाले असताना त्यांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरु आहे. 

प्राथामिक माहितीनुसार, दहशदतवाद्यांच्या गोळीबारात 10 जण ठार झाले आहेत. हा दहशतवाद्यांचा तोच गट आहे, जो राजौरी, पुंछ आणि रियासी येथील वरच्या भागांमध्ये लपला आहे. 

घटनास्थळाचे काही फोटो, व्हिडीओ समोर आले असून यामध्ये स्थानिक बचावकार्यात सहभागी झाल्याचं दिसत आहे. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या असल्याचं, पोलिसांनी सांगितंल असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

या हल्ल्यामुळे प्रदेशातील हिंसाचारात वाढ झाली आहे. शेजारच्या राजौरी आणि पूंछच्या तुलनेत रियासी जिल्ह्यात दहशतवादी कारवायांचं प्रमाण कमी आहे. मात्र या हल्ल्याने चिंता वाढवली आहे.