Marathi News> भारत
Advertisement

दहशतवाद्याचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल

दहशतवाद्याचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल

नवी दिल्ली : काश्मीरमधल्या दहशतवादाचं आणखी एक रूप जगासमोर आलंय. दक्षिण काश्मीरच्या एका भागातला हा व्हिडिओ व्हायरल झालाय. तारीक शमीम हिज्ब नावाचा दहशतवादी आपल्या साथीदारांसह काही तरूणांसमोर हातातली एके ४७ रायफल हवेत फायर करत असतानाचा हा व्हिडिओ आहे.

स्थानिक तरूण या कृत्यावर आजादी आजादी असं ओरडत शमीमला पाठिंबा देत आहेत. हा व्हिडिओ सध्या खोऱ्यात चांगलाच व्हायरल झालाय. पण या व्हिडिओची सत्यता अजून सुरक्षा दलांनी पटवलेली नाही. 

Read More