Marathi News> भारत
Advertisement

गुजरातमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलिसांना सावधानतेचा इशारा

हे घडवून आणण्यासाठी साखळी बॉम्बस्फोटांचा वापर केला जाऊ शकतो

गुजरातमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलिसांना सावधानतेचा इशारा

अहमदाबाद : गुजरातमध्ये १५ ऑगस्टपर्यंत मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'चे अनेक दहशतवादी गुजरातमध्ये उपस्थित असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलीय. २००८ प्रमाणे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे इनपुट सुरक्षा यंत्रणेकडून मिळाल्यानं गुजरात पोलीस सतर्क झालेत.   

१२ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तटावर उभारण्यात आलेल्या 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'ला धोका असल्याचा इशारा इंटेलिजन्स ब्युरोनं (आयबी) दिलाय. दहशतवाद्यांकडून स्टॅच्यु ऑफ युनिटीला उडवण्यात येऊ शकतं, असा अलर्ट सुरक्षा यंत्रणेनं दिलाय. 

हे घडवून आणण्यासाठी साखळी बॉम्बस्फोटांचा वापर केला जाऊ शकतो. आयबीच्या अलर्टवर गुजरात सरकारनं स्टॅच्यू ऑफ युनिटीची सुरक्षा वाढवलीय. या भागात पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात आलंय. 

ऑक्टोबर २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तावर १८२ मीटर उंच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चं अनावरण केलं होतं. नर्मदा नदीतील साधू बेटावर निर्मित हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो. 
 

Read More