Marathi News> भारत
Advertisement

मोदींच्या सभेत मंडप कोसळला, अनेक जण जखमी

पंतप्रधान मोदींनी सुरक्षा रक्षकांना मदतीसाठी पाठवलं

मोदींच्या सभेत मंडप कोसळला, अनेक जण जखमी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी रॅली होती. शेतकऱ्यांना संबोधित करत असतानाच या ठिकाणी मंडप कोसळला. या घटनेत आतापर्यंत 24 लोकं जखमी झाल्याची माहिती येते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. पंतप्रधान मोदींनी पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा भाषण देत होते तेव्हा ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी लोकांचे आभार मानले होते. त्यांनी म्हटलं की, इतकी मोठी घटना घडल्यानंतर ही लोकांमध्ये पळापळ नाही झाली. लोकांनी शिस्त ठेवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीजीच्या जवानांना देखील तेथे मदत करण्यासाठी पाठवलं.

घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एका जखमी व्यक्तीच्या डोक्यावर हात फिरवत मोदींनी म्हटलं की, 'तुझ्य़ामध्ये खूप हिंमत आहे बेटा.'

Read More