Marathi News> भारत
Advertisement

VIRAL VIDEO : या 'कृष्ण कन्हैय्या'ला ओळखलंत का?

अनेकांनी या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्यात

VIRAL VIDEO : या 'कृष्ण कन्हैय्या'ला ओळखलंत का?

मथुरा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादवन यांचा मोठा मुलगा आणि बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव नेहमीच असं काही तरी करायचा प्रयत्न करतात, ज्यामुळे ते मीडियाच्या नजरेत येतील. राजकारणासोबत आपल्या वेगळ्या अंदाजासाठी ते प्रसिद्ध आहेत. काही महिन्यांपूर्वी तेजप्रताप शंकराच्या अवतारात दाखल झाले होते... आता तेजप्रताप यादव यांचा नवा अवतार समोर आलाय. मथुरेत दाखल झालेल्या लालुंचा मुलगा कृष्णाच्या रुपात सोशल मीडियावर अवतरलाय. तेजप्रताप यादव यांनी इन्स्टाग्राम आणि ट्विटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत तेजप्रताप यादव श्रीकृष्णाप्रमाणे सजले आहेत... गाईंच्या कळपासमोर उभे राहून आणि डोक्यावर मोरपंख लावून ते बासरी वाजवताना या व्हिडिओत दिसत आहेत.

गायींना आपल्याजवळ बोलावण्यासाठी श्रीकृष्ण असं करत असंत, असं अनेक ग्रथांत वाचायला मिळालंच असेल.

सोशल मीडियावर त्यांचा हा अंदाज व्हायरल झालाय. अनेकांनी या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्यात.

तेजप्रताप अशा गोष्टींमुळे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जुलै महिन्यात त्यांनी शिव अवतार धारण केला होता. याच अवतारात ते शिवपूजेसाठी देवघर स्थित बाबा वैद्यनाथ धामसाठी निघाले होते. 

 

Read More