Marathi News> भारत
Advertisement

आमदार आणि माजी आमदाराची नक्षलवाद्यांकडून हत्या

दोन्ही नेत्यांची गोळ्या घालून हत्या 

आमदार आणि माजी आमदाराची नक्षलवाद्यांकडून हत्या

विशाखापट्टनम : आंध्र प्रदेशमध्ये नक्षलवाद्यांनी तेलगु देशम पार्टी (टीडीपी) च्या आमदार आणि एका माजी आमदाराची हत्या केली आहे. नक्षलवाद्यांनी गोळी मारुन त्यांची हत्या केली आहे. ANI च्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी विशाखापट्टनम जिल्ह्यातील अराकू घाटी येथे दोन्ही नेत्यांची हत्या केली आहे. आमदार सर्वेश्वर राव वायएसआरसीपी पक्षातून टीडीपीमध्ये गेले होते. तर श्रीवेरी सोमा हे माजी आमदार होते. दोन्ही नेत्यांना गोळ्या मारुन त्यांची हत्या केली गेली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी अनेकदा त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. नक्षलवाद्यांनी राव यांच्या पर्सनल असिस्‍टंटची देखील हत्या केली आहे.

Read More