Marathi News> भारत
Advertisement

मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी बनवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

tandalachi bhakri recipe: भाकरी कोणत्याही धान्याची असली तरी ती पचायला हलकी, पौष्टिक आणि ऊर्जा देणारी असते. अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या समावेशामुळे भाकरी निरोगी बनते. जर तुम्ही तांदळाची भाकरी मऊ लुसलुशीत बनवणार असला तर काही सोप्या टीप्स आहेत त्या फॉलो करा... 

मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी बनवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

tandalachi bhakri recipe: महाराष्ट्रात भाकर किंवा भाकरी म्हणजे पोटभर जेवण म्हटले जाते. जेवणात वेगळेपणा आणण्यासाठी आहारात जास्त पोषक बनवण्यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, उडीद आणि मेथी यांचे पीठ बनवूण मिश्र पिठाची भाकरी करावी. भाकरी कोणत्याही धान्याची असली तरी ती पचायला हलकी, पौष्टिक आणि ऊर्जा देणारी असते. अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या समावेशामुळे भाकरी निरोगी बनते. जर तुम्ही तांदळाची भाकरी मऊ लुसलुशीत बनवणार असला तर काही सोप्या टीप्स आहेत त्या फॉलो करा... 

  • तांदळाची भाकरी ही पौष्टिक असून शरीरात थंडावा निर्माण करते. त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे तांदळाच्या पिठाची भाकरी. तांदळाचे पीठ हा असा उपाय आहे की भाकरीचे नियमित सेवन केल्याने त्वचेचे विकार होत नाहीत. पण हीच भाकरी बनवण्यासाठी नोकरदार महिलांना पुरेसा वेळ मिळत नाही. लुसलुशीत तांदळाची भाकरी करायची असेल तर रेसिपी फॉलो करा. 
  • सर्वप्रथम परातीमध्ये एक वाटी  तांदळाचे पीठ घ्या. त्यानंतर एका भांड्यात एक कप पाणी उकळवत ठेवा. त्यात चिमूटभर मीठ घालून पाणी उकळू द्या.
  • पाणी उकळल्यानंतर तांदळाच्या पिठात पाणी मिस्क करा. हे पीठ गरम असल्यामुळे चमच्याने साह्याने मिक्स करुन घ्या. तसेच हाताला चटका बसू नये म्हणून, थंड पाण्याने पीठ मळून घ्या. 
  • पीठ मळत असताना मध्ये मध्ये हाताला पाणी लावून पीठ मळा. जेणेकरुन पीठ मऊ आणि लुसलुशीत होईल.  
  • पीठ मळून झाल्यानंतर लोखंडी तव्यावर तेलाचे 2 ते 3 थेंब टाकून ग्रीस करा. आता तवा गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा. 
  • त्यानंतर पोळपाट घ्या आणि  त्यावर प्लॅस्टिक पेपर ठेवा. त्या पेपरला तेल व पाणी लावून ग्रीस करा. त्याचप्रमाणे प्लास्टिक पेपर देखील तेल व पाणी लावून ग्रीस करा. 
  • त्यानंतर हातावर मळलेल्या पिठाचा गोळा घ्या, त्या गोळ्याला पुन्हा हातावर मळून घ्या. या पिठाचा गोळा प्लास्टिक पेपरवर ठेवा. त्यावर दुसरे प्लास्टिक पेपर ठेवा.
  • हाताने मळलेल्या पिठाला चपटा करुन घ्या, आता लाटण्याच्या साह्याने भाकरी लाटून घ्या. भाकरी तयार झाल्यावर त्यावरील प्लॅस्टिक पेपर काढा आणि भाकरी बेक करण्यासाठी तव्यावर टाका. त्यानंतर दोन्ही बाजूंने शेकून घ्या.. 
  • अशा प्रकारे, टम्म्म फुगणारी आणि न थापता, न उकड घालता तांदळाची भाकरी तयार झाली. 
Read More