Marathi News> भारत
Advertisement

'सर्जिकल स्ट्राईक'च्या व्हिडिओवरून राजकारण रंगलं

हा व्हिडिओ जाणून-बुजून प्रसिद्ध करण्यात आलाय

'सर्जिकल स्ट्राईक'च्या व्हिडिओवरून राजकारण रंगलं

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या चर्चेत 'सर्जिकल स्ट्राईक'चा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय. या व्हिडिओवरून काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार हल्ला केलाय. सेनेचं शौर्य, बलिदान, पराक्रम, साहस यांचा वापर मोदी सरकारनं आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केलेला एक निर्लज्ज प्रयत्न, असल्याचं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलंय. 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारतीय सेनेनं सर्जिकल स्ट्राईक केला होता. या घटनेला आता २१ महिने उलटलेत. त्यानंतर हा व्हिडिओ जाणून-बुजून प्रसिद्ध करण्यात आलाय. अशा कारवाया अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग सरकार काळातही झाल्यात. परंतु, सेनेच्या पराक्रमाचा वापर त्यांनी कधीही आपल्या राजकीय फायद्यासाठी केला नव्हता. सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जाहीर करण्याची गरज नव्हती कारण देशानं नेहमीच सेनेचा सन्मान केलाय, असंही त्यांनी म्हटलंय. 

Read More