Marathi News> भारत
Advertisement

हिरे व्यापाऱ्यांनाही मंदीच्या झळा, वर्षभरात १५ हजार कारागीर बेरोजगार

सूरतचा हिरे व्यापारी जगभर प्रसिद्ध आहे. इथं जगातील १० पैंकी ९ हिरे तयार होतात

हिरे व्यापाऱ्यांनाही मंदीच्या झळा, वर्षभरात १५ हजार कारागीर  बेरोजगार

सूरत : 'हिऱ्यांची नगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरतलाही 'मंदी'ची नजर लागलीय. गेल्या वर्षभरात हिऱ्यांचे अनेक छोटे-मोठे उद्योग बंद होताना दिसत आहेत. त्यामुळे जवळपास १५ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलीय. आता संसार कसा सुरू राहणार? असा प्रश्न त्यांच्यासमोर 'आ' वासून उभा आहे. तर सूरतमध्ये स्थायिक झालेले अनेक कारागीर आपापल्या गावी परतत आहेत. 

सूरतचा हिरे व्यापारी जगभर प्रसिद्ध आहे. इथं जगातील १० पैंकी ९ हिरे तयार होतात. देश-विदेशातील लोक हिऱ्यांच्या व्यापारासाठी सूरतमध्ये दाखल होतात. त्यामुळेच इथल्या हजारो-लाखो कारागिरांचे संसार उभे राहतात. परंतु, अमेरिका आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या 'ट्रेड वॉर'चा परिणाम या उद्योगावरही जाणवतोय. त्यामुळे हे उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. 

गेल्या वर्षभरावर नजर टाकली तरी अगणित छोटे-मोठे व्यापार मंदीमुळे बंद झालेत. त्यामुळे हजारो हिऱ्यांचे व्यापारी बेकार झालेत.

हिरे कारागिरांच्या संघ कार्यालयानं दिलेल्या आकड्यांनुसार, गेल्या वर्षभरात १५०० हिरे व्यापारी बेरोजगार झालेत. तर सध्या केवळ १० टक्के हिरे कारागीर त्यांच्याकडे आपलं नाव दाखल करण्यासाठी येतात. त्यामुळे हे प्रकरण गंभीरतेनं घेत संघानं मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केलीय. 

हिऱ्यांच्या एका - एका कंपनीत जवळपास २०० कारागीर कामं करून आपला उदरनिर्वाह करतात... परंतु, या कंपन्याच बंद पडल्यानं हे बेरोजगार झालेत. गेल्या वर्षभरात जवळपास १००० हून जास्त कंपन्या बंद पडल्याचं सांगितलं जातंय.  

Read More