Marathi News> भारत
Advertisement

न्या. लोयांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात

सीबीआय न्यायाधीश बृजमोहन लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 

न्या. लोयांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली : सीबीआय न्यायाधीश बृजमोहन लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 

सुप्रीम कोर्टाचे वकील अनिता शेनॉय यांनी दाखल केलेल्या पीआयएलवर ही सुनावणी चीफ जस्टिस ऑफ इंडिया दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांचं खंडपीठ करणार आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातील एक पत्रकार बंधुराज संभाजी लोने यांनीही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केलीय.

सोहराबुद्दीन प्रकरणाची सुनावणी...

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं नाव ज्या प्रकरणात जोडलं गेलं त्या सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी करत असताना न्यायाधीश लोया यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता.  

अमित शाह आरोपी

२००५ साली कथित चकमकीत सोहराबुद्दीनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबतच गुजरातचे अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचं नाव समोर आलं होतं. परंतु, या प्रकरणात त्यांना क्लीन चीट मिळाली. त्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी जस्टिस लोया करत होते... 

संशयास्पद मृत्यूवर प्रश्नचिन्ह

इंग्रजी मॅगझीन 'द कारवान'मध्ये न्या. लोया यांच्या मृत्यूवर कुटुंबीयांनी उपस्थिती केलेल्या प्रश्नांसहीत एक विस्तृत रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता. यानंतर देशातील अनेक भागांत न्या. लोया यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले.

४८ वर्षीय न्यायमूर्ती लोया याचा मृत्यू २०१४ मध्ये नागपूरमध्ये हार्ट अटॅकनं झाल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, त्यावर कुटुंबीयांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

Read More