Marathi News> भारत
Advertisement

सनी लिओनीचा विद्यापीठात डान्स; तारीख-वेळ ठरली पण...' काय घडलं नेमकं?

Sunny Leone Stage Show Cancelled: केरळच्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये सनी लिओनीचा स्टेज शो करणार होती

सनी लिओनीचा विद्यापीठात डान्स; तारीख-वेळ ठरली पण...' काय घडलं नेमकं?

Sunny Leone Stage Show Cancelled: बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनी सध्या चर्चेत आहे. सनीला तिच्या अभिनय आणि डान्समुळे चाहत्यांनी डोक्यावर घेतलंय. पण या डान्स शोमुळेच ती पुन्हा चर्चेत आली आहे. सनी लिओनीचा शो ऐनवेळी रद्द करण्यात आलाय. केरळच्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये सनी लिओनीचा स्टेज शो करणार होती. मात्र केरळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मोहनन कुनुमल यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सनीच्या शोला परवानगी नाकारली आहे. पण असं नेमकं काय घडलं की सनीचा शो रद्द करावा लागला? जाणून घेऊया. 

 5 जुलै रोजी होणार होता सनी लिओनीचा शो 

सनी लिओनीचा स्टेज शो 5 जुलै रोजी होणार होता. गेल्या बुधवारी कॉलेजच्या कुलसचिवांनाही याबाबत माहिती देण्यात आली. तारीख ठरली, वेळ ठरली. सगळीकडे बातमी पसरली. सनीचे चाहते मोठ्या संख्येने गोळा होणार होते. पण आता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मोहनन कुनुमल यांनी कुलसचिवांना निर्देश दिले. सनी लिओनीचा कार्यक्रम कॉलेजमध्ये होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना या निर्देशांतून दिल्या आहेत. 

सनीचा शो रद्द का?

एर्नाकुलम येथील कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये  संगीत महोत्सव पार पडला. यात चेंगराचेंगरी झाली होती. त्यात सनी लिओनीचा चाहता वर्ग मोठा असल्याने असे पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

या घटनेमुळे घेण्यात आला निर्णय

गेल्यावर्षी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीवरुन ताशेरे ओढले होते. अशा प्रकारच्या कार्यक्रमास सरकारकडून बंदी घातली गेली. कॉलेज कॅम्पसमध्ये डीजे नाईटलाही बंदी करण्यात आली.

तरीही सनीच्या कार्यक्रमाचे नियोजन 

अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर सरकारची बंदी असतानाही कॉलेजने सनी लिओनीसाठी कार्यक्रम आखला होता. त्यावर कुलगुरूंनी कॉलेजला कडक शब्दात समज दिली.  कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना कॅम्पसच्या आत किंवा बाहेर असे कार्यक्रम आयोजित करू दिले जाणार नाहीत, अशा कडक शब्दात कुलगुरूंनी सांगितले. 

सनी लिओनीचे वर्कफ्रंट

सनी लिओनीने 'जिस्म 2', 'रागिनी एमएमएस 2', 'एक पहली लीला', 'कुछ कुछ लोचा है', 'मस्तीजादे' यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. राहुल भटसोबत 'केनेडी' चित्रपटात ती अखेरची दिसली होती. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. याशिवाय सनी 'थी इवान' आणि 'मृदू भावे धृड क्रूते' सारख्या साऊथ चित्रपटांमध्येही दिसली आहे.

Read More