Marathi News> भारत
Advertisement

Tata Steel ने तीन महिन्यात कमावला 12 हजार कोटींचा दमदार नफा; व्यवसायात अनेक पटींनी वाढ

टाटा स्टीलचा इंटिग्रेटेड नेट प्रॉफिट चालू वित्त वर्षाच्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये अनेक पटींनी वाढला आहे.

Tata Steel ने तीन महिन्यात कमावला 12 हजार कोटींचा दमदार नफा; व्यवसायात अनेक पटींनी वाढ

मुंबई : टाटा स्टीलचा इंटिग्रेटेड नेट प्रॉफिट (integrated net profit) चालू वित्त वर्षाच्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये अनेक पटींनी वाढून 12 हजार 747 रुपये झाला आहे. उत्पन्नात वाढ झाल्याने कंपनीचा प्रॉफिट वाढला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार टाटा स्टीलने गुरूवारी शेअर बाजारात सांगितले की, मागील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत टाटा स्टीलचा नेट प्रॉफिट 1665.07 कोटी रुपये होता. (Tata Steel q2 results 2021)

कंपनीचे एकूण उत्पन्न
वृत्तानुसार कंपनीचे एकूण उत्पन्न 30 सप्टेंबर 2021 ला 60 हजार 500 कोटींवर पोहचले आहे. जे मागील एका वर्षातील तिमाहीच्या दरम्यान 39 हजार 157 कोटी रुपये होती. टाटा स्टील जगातील टॉप स्टील कंपन्यांपैकी एक आहे. वर्षाला 3.3 कोटी टन कच्च्या स्टीलचे उत्पादन करते.

टाटा स्टीलचा शेअर
टाटा स्टीलचा (TATA STEEL) शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) गुरूवारी 1299.60 रुपयांवर बंद झाला होता. शेअर प्राइजमध्ये 0.08 टक्के काहीशी वाढ नोंदवली गेली. एका रिपोर्टनुसार टाटा स्टील चालू वित्त वर्षात (2021-2022)भारतीय ऑपरेशन्सवर 8 हजार कोटींच्या भांडवलाची गुंतवणूक करणार आहेत.

Read More