Marathi News> भारत
Advertisement

100 रुपयांपेक्षाही सर्वात स्वस्त शेअर! 42 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याची क्षमता

बाजारातील सध्याच्या विक्रीच्या काळातही असे काही शेअर्स आहेत, ज्यांचे मूल्यांकन चांगले आहे आणि त्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी निर्माण होत आहेत.

100 रुपयांपेक्षाही सर्वात स्वस्त शेअर! 42 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याची क्षमता

मुंबई :  शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेमध्ये गुंतवणूकदार सावध दिसत आहेत. बाजारातील सध्याच्या विक्रीच्या काळातही असे काही शेअर्स आहेत, ज्यांचे मूल्यांकन चांगले आहे आणि त्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी निर्माण होत आहेत. या शेअर्समध्ये आणखी मजबूत कमाई करण्याची क्षमता आहे. तुम्ही देखील अशा स्टॉकच्या शोधात असाल तर CESC Limited ही सर्वोत्तम निवड असू शकते. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने 100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला असून, ब्रोकरेज हाऊसला 84 रुपयांच्या या स्टॉकमध्ये आणखी 42 टक्के वाढ अपेक्षित आहे.

CESC Ltd: 42% परतावा अपेक्षित 
ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने CESC लिमिटेडसाठी 120 रुपये (CESC Ltd BUY) चे लक्ष दिले आहे. 23 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 84 रुपयांच्या जवळपास होती. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीवरून या स्टॉकमध्ये 42.85 टक्के परतावा मिळू शकतो. या वर्षी आतापर्यंत स्टॉकमध्ये 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना स्टॉकमध्ये 52 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. या दरम्यान, स्टॉकने 57.44 ते 98.35 रुपयांची पातळी दर्शविली आहे.

ब्रोकरेज अहवाल काय सांगतो
ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, या वीज क्षेत्रातील कंपनीच्या वितरण व्यवसायात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. कंपनी प्रणालीत सुधारणा करत आहे आणि ग्राहक त्यावर सकारात्मक आहेत.

ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, कोलकाता परवाना क्षेत्र हे कंपनीचे मुख्य केंद्र आहे आणि टॅरिफ ऑर्डरची प्रतीक्षा आहे. कंपनी ईव्ही चार्जिंग, मायक्रोग्रिड्स, बीईएसएससह इतर नवीन तंत्रज्ञानावर पुढे जाण्याची तयारी करत आहे.

अशा स्थितीत कंपनीचा व्यावसायिक दृष्टिकोन लक्षात घेऊन शेअरवर 'बाय' रेटिंग कायम ठेवण्यात आले आहे. त्याची लक्ष किंमत प्रति शेअर 120 आहे.

Read More