Marathi News> भारत
Advertisement

१ लाखात सुरु करा हे ५ व्यवसाय, मिळेल पैसाच पैसा

 हे ५ पाच व्यवसाय तुम्ही लाखभर भांडवलात सुरु करु शकता

१ लाखात सुरु करा हे ५ व्यवसाय, मिळेल पैसाच पैसा

मुंबई : सध्याच्या आर्थिक संकटात अनेकांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत. त्यामुळे स्वत:चा व्यवसाय करण्यावर अनेकजण भर देतायत. व्यवसायातून चांगले उत्पन्न यावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. पण सुरुवात कशी करावी, भांडवल किती गुंतवाव ? कोणता व्यवसाय करावा असे अनेक प्रश्न काहींना पडलेले असतात. तुम्हाला देखील व्यवसायाला सुरुवात करायची असल्यास हे ५ पाच व्यवसाय तुम्ही लाखभर भांडवलात सुरु करु शकता. 

fallbacks

तुमच्याकडे गाय किंवा म्हैस असेल तर तुम्ही दुधाचा व्यवसाय सुरु करु शकता. एक गाय ३० हजार रुपयांपर्यंत मिळते. तर एक म्हैस ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत मिळते. २ गाय किंवा म्हैस घेऊन तुम्ही व्यवसाय सुरु करु शकता. विविध कंपन्यांसोबत तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देखील करु शकता. 

fallbacks

तुम्ही फुलांचा व्यवसायाने देखील सुरुवात करु शकता. लग्नापासून छोट्या छोट्या समारंभात फुलांची गरज असते. सध्या चांगल्या, कलरफुल, सुगंधी फुलांची मागणी खूप आहे. याव्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईन फूल विक्री देखील करु शकता. गुलाब, गोंड्याच्या शेतीतून पैसे कमावू शकता. 

fallbacks

रोजच्या जेवणात भाज्यांची गरज असते. त्यामुळे भाज्यांची शेती करुन मोठी कमाई तुम्ही करु शकता. अशा प्रकारच्या शेतीसाठी तुम्हाला सरकारतर्फे मदत होऊ शकेल. या शेतीतून तुम्ही बक्कळ कमाई करु शकता. 

पोल्ट्री फार्मिंग एक चांगला व्यवसाय आहे. यासाठी तुम्हाला थोडी गुंतवणूक करावी लागेल. सध्या सरकारतर्फे यासाठी मुद्रा लोन मिळते. हे लोन घेऊन तुम्ही व्यवसाय सुरु करु शकता. 

fallbacks

याशिवाय तुम्ही मासे पालन देखील करु शकता. या व्यवसायातून तुम्ही लाखोची कमाई करु शकता. 

fallbacks

Read More