Marathi News> भारत
Advertisement

वंदे भारतचा वेग मंदावणार! कोण-कोणत्या मार्गांवर होणार परिणाम?

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग मंदावणार आहे. मात्र त्याचा कोणत्या मार्गावर परिणाम होणार हे जाणून घेऊया. 

वंदे भारतचा वेग मंदावणार! कोण-कोणत्या मार्गांवर होणार परिणाम?

Vande Bharat Express: भारतीय रेल्वेने एक मोठे अपडेट दिलं आहे. रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेगावर नियंत्रण आणले आहे. त्यामुळं आता वंदे भारत ट्रेन पहिलेच्या तुलनेत कमी वेगात धावणार आहे. निजामुद्दीन दिल्ली रेल्वे स्थानकातून राणी कमलापती आणि खजुराहोपर्यंत जाणारी वंदे भारत ट्रेनचा वेग 160 होता. मात्र आता हा वेग 130 किलोमीटप प्रति तास इतका करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेकडून नवी दिल्ली ते आग्रापर्यंत कवच प्रणाली बसवण्याचे काम सुरू आहे. कवच सिस्टिमचे काम पूर्ण होईपर्यंत ट्रेनची गती कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टीने वंदे भारत ट्रेनचा वेग कमी केला आहे. 

अलीकडेच घडलेल्या बंगाल येथे घडलेल्या ट्रेन दुर्घटनेनंतर ट्रेनच्या सुरक्षिततेवर रेल्वेने चिंता व्यक्त केली होती. रेल्वे प्रशासन ट्रेन दुर्घटना रोखण्यासाठी रूळांवर कवच सिस्टम लावण्याचे काम वेगाने करत आहेत. रेल्वेकडून सर्व रुट आणि ट्रेन स्वदेशी प्रणाली अंतर्गंत कवच सिस्टम बसवण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. त्यामुळं जोपर्यंत रेल्वे रूळांवर सुरक्षा कवच बसवण्यात येत नाही तोपर्यंत वंदे भारत ट्रेनचा स्पीड कमी करण्यात येणार आहे. 

रेल्वेने दिली महत्त्वाची माहिती

- नवी दिल्ली ते पलवल-आग्रा रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग कमी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

- नवी दिल्ली-राणी कमलापती वंदे भारत, हजरत निजामुद्दीन-खजुराहो वंदे भारत आणि नवी दिल्ली-वीरांगना लक्ष्मीबाई झाशी गतिमान एक्स्प्रेसचा कमाल वेग ताशी १६० किलोमीटर आहे. या मार्गावर कवचचे जाळे तयार करण्याचे काम सुरू आहे. पलवल आणि आग्रा दरम्यान सुमारे 80 किलोमीटरवर हे काम पूर्ण झाले आहे.या संपूर्ण रेल्वे विभागाचे काम पूर्ण होईपर्यंत या गाड्यांचा कमाल वेग ताशी 130 किलोमीटरपर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काम पूर्ण होईपर्यंत गती कमी ठेवण्यात येणार आहे. 

काय आहे कवच प्रणाली? 

कवच ही एक स्वयंचलित एटीपी प्रणाली आहे. चालकाने वेळेवर ब्रेक लावला नाही तर गाडीचा वेग नियंत्रित करण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. कवचद्वारे चालकांना रेल्वेमार्गावरील धोक्याचे सिग्नल ओळखण्यात मदत होणार आहे. रेल्वेच्या सुरक्षेसाठी वापरली जाणारी कवच ​​प्रणाली वापरण्यात येते. भारतात घडलेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर ही कवच प्रणाली भारतीय रेल्वेने विकसित केली आहे. 

Read More