Marathi News> भारत
Advertisement

'काही टीममेंबर्स माझ्यावर जळायचे'- इरफान पठाण

टीममधील काही मेंबर्स माझ्यावर जळायचे असे वक्तव्य इरफान पठाण याने केलयं. 

'काही टीममेंबर्स माझ्यावर जळायचे'- इरफान पठाण

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी ऑलराऊंड इरफान पठाण याने टीमच्या खेळाडूंविषयी गौप्यस्फोट केलाय. टीममधील काही मेंबर्स माझ्यावर जळायचे असे वक्तव्य इरफान पठाण याने केलयं. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. 

इरफान का ?

मला तिसऱ्या क्रमांकावर पाठवल्याचे काही खेळाडूंच्या डोळ्यात खुपत होते. याला तिसऱ्या क्रमांकावर का पाठवता ? याच्याऐवजी मला पाठवा असे त्याने कॅप्टनला म्हटले होते. 

तो कोण ?

इरफानला दुजेपणाची वागणूक देणारा हा खेळाडू कोण ? अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली. पण इरफानने यासंदर्भात कोणताच खुलासा केला नाही. 

पांड्याला काळजी नाही

इरफानच्या बडोदा संघातल्या हार्दिक पांड्याच्या खेळाबद्दल विचारण्यात आले.

त्यावेळी जोपर्यंत कर्णधार आणि कोचच्या पसंतीस पांड्या आहे तोपर्यंत त्याला कोणत्या काळजीचे कारण नाही असे इरफानने सांगितले. 

Read More