Marathi News> भारत
Advertisement

उद्यापासून बदलणार हे 5 नियम, ज्याचा सर्वमान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला जुन्या नियमांमध्ये काही बदलांसह नवीन नियम लागू होतात.

उद्यापासून बदलणार हे 5 नियम, ज्याचा सर्वमान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

मुंबई : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजे उद्यापासून अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत, होम लोन ऑफर, एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफर, आधार-यूएएन लिंक इत्यादींचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला जुन्या नियमांमध्ये काही बदलांसह नवीन नियम लागू होतात. ज्याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती मोठा परिणाम होतो. ज्यामुळे लोकांना त्यांच्यासंदर्भात ही माहिती असणे गरजेचे आहे.

UAN-आधार लिंकिंग

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असेल, तर तो 30 नोव्हेंबरपर्यंत आधार क्रमांकाशी लिंक करा. 1 डिसेंबर 2021 पासून, कंपन्यांना फक्त अशाच कर्मचाऱ्यांचे ECR (इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न) दाखल करण्यास सांगितले आहे ज्यांचे UAN आणि आधार लिंकिंग सत्यापित झाले आहे. जे कर्मचारी उद्यापर्यंत ही लिंक दाखल करू शकणार नाहीत ते ECR देखील दाखल करू शकणार नाहीत.

गृह कर्ज ऑफर

सणासुदीच्या काळात, बहुतेक बँकांनी गृहकर्जाच्या विविध ऑफर दिल्या होत्या, ज्यात प्रक्रिया शुल्क माफी आणि कमी व्याजदर यांचा समावेश होता. बहुतांश बँकांच्या ऑफर 31 डिसेंबर रोजी संपत आहेत परंतु LIC हाउसिंग फायनान्सची ही ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंतच संपत आहे.

SBI क्रेडिट कार्ड

तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 डिसेंबरपासून SBI च्या क्रेडिट कार्डने EMI वर खरेदी करणे महाग होणार आहे.

गॅस सिलेंडरची किंमत

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमती निश्चित केल्या जातात. व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचे नवीन दर महिन्याच्या पहिल्या दिवशी जारी केले जातात. त्यामुळे याचे नवीन दर 1 डिसेंबरला सकाळी जाहीर केले जातील.

जीवन प्रमाणपत्र

जर तुम्ही देखील पेन्शनधारकांच्या श्रेणीत येत असाल तर ते लगेच करा. पेन्शनधारकांनी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा १ डिसेंबरपासून तुम्हाला पेन्शन मिळणे बंद होईल.

Read More