Marathi News> भारत
Advertisement

सरकारी मदतीने सुरू करा हा small business, प्रत्येक महिन्याला लाखोंचा नफा

देशात वाढत्या प्रदुषणामुळे प्लास्टिक वापरावर सरकारने निर्बंध घातले आहेत. तसेच अनेक लोक आता प्लास्टिकला स्वतःहून टाळत आहेत. त्यामुळे डिस्पोजल वस्तूंची मागणी वाढली आहे. यामाध्यमातून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता. हा व्यवसाय तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो. 

सरकारी मदतीने सुरू करा हा small business, प्रत्येक महिन्याला लाखोंचा नफा

नवी दिल्ली : देशात वाढत्या प्रदुषणामुळे प्लास्टिक वापरावर सरकारने निर्बंध घातले आहेत. तसेच अनेक लोक आता प्लास्टिकला स्वतःहून टाळत आहेत. त्यामुळे डिस्पोजल वस्तूंची मागणी वाढली आहे. यामाध्यमातून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता. हा व्यवसाय तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो. जाणून घेऊ या. सरकारचीही या व्यवसायासाठी कशी मदत होऊ शकते.

मार्केटमध्ये पेपर कप, पेपर प्लेटची मागणी वाढली आहे.  याचा तुम्हा फायदा घेऊ शकता.कमीत कमी गुंतवणुकीतून लहान व्यवसाय सुरू करून जबरदस्त नफा मिळवू शकता. यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचाही फायदा घेता येईल. मुद्रा योजनेच्या माध्यमातून व्यवसायासाठी सबसिडी देखील मिळते.

व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी सबसिडी
यासाठी सर्वात आधी तुम्हाला मशीनची गरज पडणार आहे. ही मशीन हैद्राबाद, दिल्ली, आग्रा आणि अहमदाबाद सारख्या अनेक शहरांमध्ये मिळू शकते. बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला 500 चौ.फुटाच्या जागेची आवश्यकता असेल. मशीनरी, इक्विपमेंट, फर्निचर, डाई, इलेक्ट्रिकेशन, इंस्टॉलेशन आदींचा खर्च 10.70 लाखापर्यंत अपेक्षित आहे.

या व्यवसायासाठी स्किल्ड आणि अनस्किल्ड दोन्ही कामगारांची गरज असेल. कामगारांवर साधारण 35 हजार रुपये महिन्याला खर्च अपेक्षित आहे.

प्रॉफिट 
जर तुम्ही 300 दिवस काम केले तर, एवढ्या दिवसांमध्ये 2.20 कोटी युनिट पेपर कप तयार होतील. या पेपर ग्लासची विक्री 30 पैशे प्रति नगने केल्यास चांगली कमाई करता येईल.

Read More