Marathi News> भारत
Advertisement

'सीरिया-अफगाणिस्तान' प्रमाणे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा पॅटर्न

आतापर्यंत घाटीमध्ये झालेल्या हल्ल्यापेक्षा हा हल्ला वेगळा होता.

'सीरिया-अफगाणिस्तान' प्रमाणे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा पॅटर्न

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरूवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 44 जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. जम्मू काश्मीरहून पुलवामामध्ये जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यातील एका बसवर एक गाडी येऊन आदळली. यामध्ये 44 जवान शहीद तर अनेकजण जखमी झाले. दहशतवाद्यांनी यावेळे हल्ला करताना जुनी पद्धत वापरली. ज्या प्रकारे हल्ला झाला ती पद्धत सिरिया आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये वापरण्यात आली होती.

कसा झाला हल्ला ? 

गुरुवारी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी पुलवामामध्ये लष्कराच्या ताफ्यावर हा हल्ला झाला. या ताफ्यात लष्कराच्या 70 गाड्या होत्या. यामध्ये 20 हून अधिक बस, ट्रक आणि एसयूव्ही गाड्या होत्या. सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार 76Bn सीआरपीएफ बसवर हा हल्ला झाला.

वेगळ हल्ला 

fallbacks

आतापर्यंत घाटीमध्ये झालेल्या हल्ल्यापेक्षा हा हल्ला वेगळा होता. याआधी भारतामध्ये अशाप्रकारचे हल्ले फार कमी झाले आहे. या हल्ल्यामध्ये दहशतवादी मरणाचे सारे सामान घेऊन आला आणि लष्कराच्या ताफ्यात घुसला. यामुळे पूर्ण बस होत्याची नव्हती झाली आणि आजुबाजूच्या वाहनांना देखील नुकसान पोहोचले. अशा प्रकारचे हल्ले गेल्या काळात अफगाणिस्तान आणि सिरयामध्ये पाहायला मिळाले. 

अफगाणिस्तानमध्ये अनेकदा संसदेजवळ, मोठ्या अधिकाऱ्याच्या घराजवळ भीषण हल्ले झाले. यामध्ये कारमध्ये बसलेली व्यक्ती थेट बिल्डींगमध्ये घुसते आणि आत्मघातकी स्फोट घडवून आणते. तर सिरीयामध्ये देखील आयएस आणि सुरक्षारक्षकांच्या युद्धात अशा प्रकारची पद्धत वापरण्यात आली होती. 

Read More