Marathi News> भारत
Advertisement

दुचाकीवरुन जात असताना Silent Heart Attack; 26 वर्षांच्या तरुणाने गमावला जीव

Silent Heart Attack Case On Bike: बाइकवर जात असताना एका तरुणाला हार्ट अॅटक आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

दुचाकीवरुन जात असताना Silent Heart Attack; 26 वर्षांच्या तरुणाने गमावला जीव

Silent Heart Attack Case On Bike: तरुणांमध्ये हल्ली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. इंदूरमध्ये चालत्या बाईकवर एका युवकाला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याचे समोर आले आहे. हार्ट अ‍ॅटेक आल्याने तो चालत्या बाइकवरुनच खाली कोसळला. आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या तरुणाचा मृत्यू झाला होता. 

चालत्या बाइकवरुन कोसळला

राहुल रायकवार असं या तरुणाचे नाव आहे. त्याचे वय हे फक्त 26 वर्ष आहे. शनिवारी तो त्याच्या लहान भावासोबत सामान आणण्यासाठी जात होता. राहुल बाईकवर मागे बसला होता तर त्याचा लहान भाऊ बाईक चालवत होता. रस्त्यातच राहुलच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यानंतर तो बाईकवरुनच खाली कोसळला. आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी त्याच्या लहान भावाच्या मदतीने त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. 

दीड वर्षांची मुलगी पोरकी

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सायलेंट अॅटेकच्या कारणाने त्याचा मृत्यू झाला आहे. राहुलला दीड वर्षांची मुलगी आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याने मुलीचे जावळ केले होते. तो इलेक्ट्रेशियन म्हणून काम करत होता. राहुलच्या मृत्यूनंतर दीड वर्षांची मुलगी वडिलांच्या मायेपासून पोरकी झाली आहे. वडिलांचे छत्र हरवले आहे. राहुलच्या आकस्मात मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. तर, परिसरातही एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका

काही दिवसांपूर्वी 18 वर्षांच्या विद्यार्थ्याला कोचिंग क्लासमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली होती. तो मध्य प्रदेशातील एका कोचिंग क्लासमध्ये लोक सेवा आयोग (एमपीपीएससी)साठी प्रवेश परीक्षेसाठी कोचिंग क्लाससाठी जात होता. क्लास सुरू असतानाच त्याला छातीत दुखू लागले. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. 

तरुणांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकचे प्रमाण वाढले

भारतात कमी वयात हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही हार्ट अॅटेक येत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनियमित जेवण, दिनचर्चा, व्यायामाचा अभाव, पोषण नसलेले जेवण, जंक फूड, अपुरी झोप, ताण-तणाव ही हार्ट अ‍ॅटेकची मुख्य कारणे आहेत. 

Read More