Marathi News> भारत
Advertisement

Shraddha Murder Case: आरोपी आफताब आपल्या कुटुंबियांना भेटणार, कोर्टाने दिली परवानगी

श्रद्धा हत्या प्रकरणात (Shraddha Murder Case) तिसऱ्या व्यक्तीचा समावेश? आफताबच्या (Aaftab Poonawala) वकिलांचा खळबळजनक दावा  

Shraddha Murder Case: आरोपी आफताब आपल्या कुटुंबियांना भेटणार, कोर्टाने दिली परवानगी

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होतायत. आफताबने (Aaftab Poonawala) दिल्लीच्या साकेत कोर्टात (Delhi Saket Court) धक्कादायक कबुली दिलीय. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं न्यायाधीशांसमोर कबूल केलंय. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा (Video Conferencing) आफताबला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं, तेव्हा त्याने ही कबुली दिलीय. दरम्यान  आफताबच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ करण्यात आलीय.  आफताबची आता पॉलीग्राफ टेस्टही (Polygraph Test) केली जाणार आहे. दिल्ली पोलिसांना (Delhi Police) त्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली आहे. आफताब चौकशीत अनेक प्रश्नांची उत्तर चुकीची देतोय. त्यामुळे आफताबची नार्को टेस्ट (Narco Test) केली जाणार आहे. पण पॉलिग्राफ झाल्यानंतरच नार्को टेस्ट करण्यात येते. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी मागितली होती. 

आफताब कुटुंबियांना भेटणार
दरम्यान आफताबला त्याच्या कुटुंबियांना भेटण्याची कोर्टाने परवानगी दिली आहे. यासाठी आफताबच्या वकिलांनी कोर्टाकडे विनंती केली होती. आफताबला त्याच्या कुटुंबियांना भेटण्यास परवानगी देण्यात यावी अशी विनंती वकिलांनी कोर्टात केली. यावर कोर्टाने परवानगी दिली आहे. आफताबचे वकिल अविनाश यांनी केलेल्या दाव्यानुसार आफताबचं कुटुंब (Aaftab Poonawala Family) बेपत्ता नाही. एक ते दोन दिवसात ते त्याच्या कुटुंबाशी संपर्क करतील. आफताब चौकशीत सहकार्य करत असल्याचा दावाही आफताबच्या वकिलांनी केला आहे. ज्या जंगलात त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकले, त्या जागेची माहिती आफताबने पोलिसांना दिल्याचं वकिल अविनाश यांनी म्हटलं आहे. 

आफताबचा वकिलांचा धक्कादायक दावा
आफताबच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे. आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली कोर्टात दिली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. जे काही घडलं ते रागाच्या भरात घडलं असावं. याचाच अर्थ त्याला कोणीतरी भडकलं असावं किंवा या पूर्ण प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीचा समावेश असावा, असं आफताबच्या वकिलांनी कोर्टात सांगतिलं.

हे ही वाचा : पीओकेत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक? भारतीय लष्कर POKमध्ये ऑपरेशनसाठी तयार

पोलिसांची सर्वात मोठी शोधमोहिम
श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आता सर्वात मोठी शोधमोहीम सुरु केलीय. श्रद्धाच्या हत्येच्या तपासात पुढचे 100 तास महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच दिल्ली पोलिसांची 200 जणांची सर्वात मोठी टीम तयार करण्यात आलीय. श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन ते जंगलात आणि तलावात फेकण्यात आले होते. त्यामुळे हे तुकडे शोधण्याचं सर्वात मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. आतापर्यंत श्रद्धाचा जबडा तसंच 18 हाडं सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. हे अवशेष तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. आफताबच्या मोबाईलच्या लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी एक नकाशा तयार केलाय. तो जिथे जिथे गेलाय त्या घटनास्थळावर पोलीस शोध घेणार आहेत.

आफताब 4 मोबाईल नंबर वापरत होता
आफताब पुनावाला हा 4 मोबाईल नंबर वापरत होता अशी धक्कादायक माहिती आता समोर येतेय. 4 वेगवेगळे नंबर आफताबकडे आढळून आले आहेत. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवले. फ्रिज मागवण्यासाठी जो नंबर आफताबने वापरला तो श्रद्धाच्या नावावर असल्याची माहितीही समोर येतेय. विशेष म्हणजे फेसबुकचं लॉग इन करण्यासाठी श्रद्धा हाच मोबाईल वापरत होती. श्रद्धाच्या फेसबुक अकाऊंट आणखी एका नंबरसोबतसुद्धा लिंक होतं. आफताबच्या फेसबुक अकाऊंटचा जेव्हा तपास करण्यात आला तेव्हा ही सर्व माहिती समोर आलीय. त्याच्या फेसबुक आयडीसोबतही दोन नंबर लिंक होते. त्यामुळे आफताब दोन मोबाईल नंबरवरुन फेसबुक अकाऊंट वापरत असल्याचं दिसून येतंय.

Read More