Marathi News> भारत
Advertisement

लेहला जम्मू काश्मीरचा भाग दाखवला, ट्विटरवर कारवाई करण्याचे संकेत

ट्विटरवर ( Twitter) कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. याबाबत नोटीसही पाठविण्यात आली आहे.   

लेहला जम्मू काश्मीरचा भाग दाखवला, ट्विटरवर कारवाई करण्याचे संकेत

नवी दिल्ली : समाजमाध्यमातील एक प्रमुख ट्विटरवर ( Twitter) कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. लेहला (Leh ) जम्मू काश्मीरचा ( Jammu and Kashmir) भाग दाखवल्याने ट्विटरवर (Twitter) ही कारवाई होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. याबाबत नोटीसही पाठविण्यात आली आहे.

भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाकडून (Twitter gets government notice for showing Leh in Jammu and Kashmir) ट्विटरवर कारवाई होण्याची शक्यता आहे. ट्विटरने ९ नोव्हेंबरला लेहला जम्मू काश्मीरचा भाग दाखवला होता. या प्रकरणी आयटी मंत्रालयाने ट्विटरला नोटीस (Notice) जारी केली आहे. भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा अपमान केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, अशी नोटीस ट्विटरला पाठवण्यात आली आहे. 

या नोटिसीला ट्विटरने पाच दिवसांत उत्तर द्यायचे आहे. अन्यथा ट्विटरवर कारवाई होऊ शकते. दिलेल्या मुदतीत ट्विटरनं उत्तर दिले नाही किंवा त्यांच्या उत्तराने आयटी मंत्रलयाचे समाधान झाले नाही, तर ट्विटरवर कारवाई होऊ शकते. ट्विटरच्या अधिकाऱ्यांना तुरूंगात पाठवणे किंवा ट्विटरवर बंदी आणणे अशा प्रकारची कारवाई या प्रकरणी होऊ शकते.

Read More