Marathi News> भारत
Advertisement

धक्कादायक VIDEO : शिपाई न्यायाधीशांना थुंकी मिसळून पाणी पाजायचा

धक्कादायक VIDEO :  शिपाई न्यायाधीशांना थुंकी मिसळून पाणी पाजायचा

मुंबई : उक्कर प्रदेशमधील अलीगडमधला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक शिपाई न्यायाधीशांना पाण्यात थुंकी मिसळून पाणी देत असे. हा प्रकार व्हिडिओच्या मार्फतसमोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महत्वाची बाब म्हणजे न्यायाधीशांना शिपायावर संशय आल्यामुळे त्यांनी कॅमेरा लावून हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. 

अलीगडमध्ये एका शिपायाचे संतापजनक कृत्य समोर आले आहे. तो न्यायाधीशांना थुंकी मिसळलेले पाणी पिण्यासाठी द्यायचा. शिपायाचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. शिपायाला निलंबित करून विभागीय चौकशी बसवण्यात आली आहे.  हा व्हिडिओ 4 दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायाधीशांना शिपायावर आधीपासूनच संशय होता. एका दिवशी त्यांनी टेबलखाली कॅमेरा लावला. जेव्हा व्हिडिओ पाहिला,  तेव्हा त्यांना धक्का बसला. 

 शिपाई ग्लासामध्ये पाणी ओतल्यानंतर त्यात थुंकी मिसळायचा. मग तेच पाणी पिण्यासाठी न्यायाधीशांना नेऊन द्यायचा. जिल्हा न्यायाधीश प्रेमकुमार सिंह यांनी याप्रकरणी शिपायाला निलंबित करून चौकशी समिती बसवण्याला दुजोरा दिला आहे.
 

Read More