Marathi News> भारत
Advertisement

तुम्ही खात असलेलं TATA चं मीठ भेसळ तर नाही ? एका बोगस कंपनीला पोलिसांचा दणका

खाण्यापिण्यात भेसळ करणाऱ्या एका कंपनीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

तुम्ही खात असलेलं TATA चं मीठ भेसळ तर नाही ? एका बोगस कंपनीला पोलिसांचा दणका

लखनऊ : Latest Crime News: खाण्यापिण्यात अत्यंत महत्वाचं असलेलं मीठ आपली दररोजची गरज आहे. या जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. 

खऱ्या आणि ब्रँडेड मीठाच्या नावाखाली बनावट मीठ विकणाऱ्या एका कंपनीचा दादरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 600 क्विंटल बनावट मीठ आणि 24 हजारांहून अधिक टाटा सॉल्टचे रॅपर जप्त केले आहेत.

टाटा कंपनीच्या मिठाच्या नावाखाली बनावट मिठाचा गंडा घातला जात असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. हा सगळा काळाबाजार दादरी(उत्तरप्रदेश) येथील एका कंपनीत सुरू असून तेथून दिल्ली आणि लगतच्या राज्यात टाटा मिठाचा बनावट पुरवठा होत असल्याची माहिती ही मूळ टाटा कंपनीकडूनच पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी रचला सापळा...

Salt Forge Story: ही तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तपास सुरू केला. दरम्यान, टाटा कंपनीचा अधिकाऱ्यांनी पोलिसांना योग्य ती माहिती पुरवली त्यावरून पोलिसांनी लोडर वाहन पकडले. त्या वाहनातून मोठ्या प्रमाणात बनावट मीठही जप्त करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या मिठाचे वजन 600 क्विंटल असून बाजारात त्याची किंमत 15 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर चालकाच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्या कंपनीवर छापा टाकला. पोलीस पुढील कारवाई करीत आहे.

Read More