Marathi News> भारत
Advertisement

Corona : मारणानंतरही यातना संपेना! कबर खोदून बाहेर काढला मृतदेह

रूग्णालयाचा हलगर्जीपणा, मृतदेहाची अदला बदली 

Corona : मारणानंतरही यातना संपेना! कबर खोदून बाहेर काढला मृतदेह

मुंबई : कोरोनाचा (Corona Virus) उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाबाधितांसोबतच (Covid-19) कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रूग्णांचा आकडा देखील उच्चांक गाठत आहे. असं असताना अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांच्या मृतदेहाची अदली बदली झाली. (Shocking Hindu Muslim Death Body Exchange Corona virus Covid Hospital) हिंदू व्यक्तीचा मृतदेह पुरण्यात आला. सत्य समोर आल्यावर मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे अंगावर काटा आला असून भीतीच वातावरण निर्माण झालं. 

रूग्णालयाचा हलगर्जीपणा भोवला 

उत्तर प्रदेशातील जनपद मुरादाबाद येथील एका खासगी रूग्णालयात कोरोनाबाधित दोन मृतदेहाची अदला बदली झाली. दोन्ही मृतदेह हे वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचे होते. हलगर्जीपणामुळे मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात हंगामा केला. नातेवाईकांचा आरोप आहे की, रुग्णालयाच्या गोंधळामुळे हिंदू व्यक्तीचा मृतदेह मुसलमान नातेवाईकांकडे आणि मुसलमान व्यक्तीचा मृतदेह हिंदू व्यक्तीकडे सोपवण्यात आला. 

नातेवाईकांनी रुग्णालयावर विश्वास ठेवत मृतदेह सिविल लाइन ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कब्रस्तानमध्ये मृतदेह पुरला. तर दुसऱ्या समुदयाने अंत्यंसंस्काराकरता संपूर्ण तयारी करून मतृदेह बाहेर काढला तेव्हा ही मृत व्यक्ती आपली नातेवाईक नसल्याचं समोर आलं. धावपळ करत मृतदेह पुन्हा रूग्णालयात नेल्यावर रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचं समजलं. 

काय आहे नेमका प्रकार? 

बरेलीच्या सुभाष नगरमध्ये राहणार रामप्रताप सिंह यांना हृदय विकाराचा त्रास होता. 16 एप्रिल रोजी त्यांची तब्बेत बिघडली. त्यांना खासगी कॉसमॉस रूग्णालयात दाखल करण्यात आले. 16 एप्रिलला त्यांना कळलं की रामप्रताप सिंह हे कोरोनाबाधित आहेत. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. 19 एप्रिल रोजी दुपारी रूग्णालयाने त्यांना मृत घोषित केलं. 

त्यांना मुखाग्नि देण्याकरता मृतदेहाचा चेहरा पाहिला तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे दुसऱ्या कोरोनाबाधित मृत युवकाचा मृतदेह त्यांना सोपवण्यात आला होता. यानंतर एकच गोंधळ उडाला. रूग्णालयातून यावर उलट या मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचे सल्ले देऊ लागले. 

यानंतर पोलिसात रितसर तक्रार करून हा गुंता सोडवण्यात आला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप झाला आहे. ही घटना मन सुन्न करणारी आहे. 

Read More