Marathi News> भारत
Advertisement

मुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी

Father Commits Suicide: अशी वेळ कोणावरही येऊ नये, मुलांचा हट्ट पुरवता आला नाही म्हणून बापाने स्वतःलाच संपवल्याची घटना समोर आली आहे.   

मुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी

Today News In Marathi:  रक्षाबंधन हा सण पवित्र नात्याचा आणि आनंदाचा असतो. या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याला ओवाळून राखी बांधते. तर, भाऊही बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. आनंद घेऊन येणारा सण मात्र एका कुटुंबाच्या वाट्याला आभाळाऐवढं दुखः घेऊन आला आहे. उत्तर प्रदेश येथील हरदोई जिल्ह्यातील कायमपुर गावात राहणाऱ्या एका कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. सणाच्या दिवशी मुलांची एक छोटीशी इच्छा पूर्ण करु न शकल्याने बापाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने तीन मुलं अनाथ झाली आहेत. 

रक्षाबंधनाच्या दिवशी मुलांनी वडिलांकडे मिठाई आणण्याचा हट्ट केला. मात्र खिशात पैसे नसताना मुलांचा हट्ट पुरवणे त्यांना जमले नाही. सणाच्या दिवशीही मुलांचा हट्ट पुरवता आला नाही. यामुळं दुखी झालेल्या वडिलांनी घरापासून 200 मीटर लांब असलेल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

शैलेंद्र असं या व्यक्तीचे नाव असून त्याला दोन मुलं राहुल, अंशुमान व एक मुलगी निलम अशी तीन मुलं आहेत. शैलेंद्र यांच्या पत्नी सियादेवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षाबंधन असल्याकारणाने मुलांनी त्यांच्या वडिलांकडे मिठाई आणण्याचा हट्ट केला. मात्र, तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. शैलेंद्र यांना कित्येक दिवसांपासून काम मिळत नव्हते. त्यामुळं आर्थिक तंगीला वैतागून त्यांनी जीव दिल्याची घटना घडली आहे, 

मुलांचा हट्ट पूर्ण न करु शकल्याने शैलेंद्र अस्वस्थ होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी घरापासून जवळपास 200 मीटर दूर असलेल्या झाडाला गळफास घेऊन त्यांने आपले आयुष्य संपवले. गावकऱ्यांनी शैलेंद्र याला झाडाला लटकलेले पाहताच लगेचच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत त्याचा मृतदेह खाली उतरवला आणि रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप पोस्टमार्टम रिपोर्टसमोर आला नसून त्यानंतरच हत्येचे कारण स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. 

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शैलेंद्रची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. तो मजुरी करुन कुटुंबाचे पालनपोषण करत होते. त्याची मुलंही सतत आजारी असायची. त्यांच्या उपचारांसाठी त्याने कर्ज काढले होते. त्यामुळंही तो तणावात होता. शैलेंद्रच्या वडिलांचे नदीकिनारी दीड एकर जमीन आहे. ज्यात त्याचे दोन भाऊ हिस्सेदार होते.  तर, यंदाच्या पावसाच्या पाण्यात शेतातही पाणी घुसले होते. इतकंच काय तर शैलेंद्रकडे रेशनकार्डदेखील नव्हते.

Read More