Marathi News> भारत
Advertisement

गेट परिक्षेत मध्य प्रदेशचा शशांक मंगल अव्वल स्थानी

मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात राहणाऱ्या २१ वर्षीय शशांक मंगलने या परिक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे.

गेट परिक्षेत मध्य प्रदेशचा शशांक मंगल अव्वल स्थानी

गेट 2019 परिक्षेचे निकाल जाहिर करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात राहणाऱ्या २१ वर्षीय शशांक मंगलने या परिक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्या या विजया मुळे मध्य प्रदेशात सर्वत्र आनंदाचे वातावण पाहायला मिळत आहे. त्याने परिक्षेत १००० पैकी ९८९ गुण मिळवले आहेत. शशांक आयआयटी धनबाद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. गेट परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थांना जर नोकरी करायची असेल तर पीएसयू मध्ये त्यांच्या गेट गुणांच्या आधारावर त्यांना नोकरी मिळते.  

गेट परिक्षेच्या गुणवत्तेच्या आधारावर देश आणि विदेशातल्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीसाठी विद्यार्थांची निवड करण्यात येते. यावर्षीचा टॉपर विद्यार्थी शशांक आयआयटी धनबाद विद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंगचे शिक्षण घेत आहे. जेईई अॅडव्हांस परिक्षेत त्याने ६२१४ गुण मिळवले होते. 

शशांकला देशाची सेवा करण्याची इच्छा आहे. सर्वात आधी तो पीएसयू मध्ये नोकरी करणार आहे आणि नंतर इंडियन इंजीनियरिंग सर्विसेसची तयारी करणार आहे. शशांकच्या म्हणण्यानुसार आपल्या देशात इंजीनियरिंग क्षेत्राचा विकास झपाट्याने होत नाही. कारण नोकरी मिळाल्या नंतर इंजीनियर्स विद्यार्थांचे नुतनीकरणा कडे दुर्लक्ष होते. शशांकने त्याच्या इंजीनियरिंगचा उपयोग देशसाठी करणार आहे. पेपर-पेन वर आधारित देशाच्या अर्थव्यवस्थेला ऑटोमेशनच्या जगात नेण्याचा शशांकचा ध्यास आहे. सध्या तो मशीन लर्निंगच्या प्रकल्पावर काम करीत आहेत. 

Read More