Marathi News> भारत
Advertisement

Share Market Update : आज हे शेअर करतील तुम्हाला मालामाल; कोणते आहेत ते शेअर?

निवडक शेअर खरेदी करून चांगली कमाई केली जाऊ शकते. 

Share Market Update : आज हे शेअर करतील तुम्हाला मालामाल; कोणते आहेत ते शेअर?

मुंबई : आज पाहायला गेलं तर अनेक जण विशिष्ट कंपनीच्या शेअरमध्ये पैसे गुंतवतात आणि कालांतराने हे शेअर आपल्याला चांगले रिटर्न्स मिळवून देतात. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर मार्केटमध्ये झळाळी पाहायला मिळाली. ऑटो आणि आयटी शेअर्स  खरेदी केल्यामुळे बाजाराचे प्रमुख निर्देशांक हिरव्या चिन्हावर बंद झाले. जुलै महिन्यातील ऑटो कंपनीच्या विक्रीत वाढ झाली. त्याचप्रमाणे मालमत्ता नोंदणीमध्ये वाढ झाल्याने बाजाराच्या भावनांवरही त्याचा परिणाम झाला.

मंगळवारी निवडक शेअर खरेदी करून चांगली कमाई केली जाऊ शकते. 
टाटा पावर (Tata Power), इंडियाबुल्स हाउसिंग फाइनेंस (Indiabulls Housing Finance), चोलामंडलम इनवेस्ट (Cholamandalam Invest), यूनियन बँक ऑफ इंडिया, अडानी पोर्ट एंड एसईजेड, भारत पेट्रोलियम, बँक ऑफ इंडिया, गुजरात गॅपूर्वांकरा आणि ब्रिटानिया या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. 

याशिवाय  एसीसी, अंबुजा सीमेंट्स आणि बाटा इंडिया या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. पण कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यानंतरचं कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवा. 

या कंपनीच्या शेअर्सपासून दूर राहा
जीटीएल इंफ्रास्ट्रक्चर (GTL Infrastructure), एलएन्डटी (L&T), सतलज टेक्सटाइल्स, जेके लक्ष्मी सीमेंट, केईसी इंटरनॅशनल, मेट्रोपोलिस हेल्थकेयर, इप्का लेबोरेट्रीज आणि पॉली मेडीक्योर या कंपनीचे शेअर खरेदी करणाता विचार करा. 

Read More