Marathi News> भारत
Advertisement

'सिरम' आणि भारत बायोटेक 'कोरोना लस'ची करावी लागणार आणखी प्रतीक्षा

कोरोना (Corona Virus) प्रतिबंधक 'लस'च्या (Corona Vaccine) आपत्कालीन परवान्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपन्यांनी केलेले अर्ज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने प्रलंबित ठेवलेत. 

'सिरम' आणि भारत बायोटेक 'कोरोना लस'ची करावी लागणार आणखी प्रतीक्षा

मुंबई : कोरोना (Corona Virus) प्रतिबंधक 'लस'च्या (Corona Vaccine) आपत्कालीन परवान्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपन्यांनी केलेले अर्ज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने प्रलंबित ठेवलेत. 'कोरोना लस'बाबत आणखी तपशील सादर करण्याची सूचना समितीने दोन्ही कंपन्यांना केली आहे. त्यामुळे कोरोनावरील 'लस'ची (Corona Vaccine) वाट पाहणाऱ्या भारतीयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

कोरोनावरील 'लस'च्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची मागणी करणारे अर्ज फायझर कंपनीपाठोपाठ सीरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक यांनी केले होते. या तिन्ही कंपन्यांच्या अर्जाबाबत तज्ज्ञ समितीने काल चर्चा केली. 'कोरोना लस'च्या परिणामकारकतेच्या दाव्याला बळकटी देणाऱ्या तपशिलाची गरज असल्याचे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. मात्र तिन्ही कंपन्यांनी हा तपशील सादर केलेला नाही. 

फायझर कंपनीची लस वेगळी म्हणजे ‘एमआरएनए’ पद्धतीची आहे. त्यावर अभिप्राय देऊ शकणारे तज्ज्ञ बैठकीस उपस्थित नव्हते. त्यामुळे फायझरच्या 'लस'बाबत निर्णय झाला नाही. तसेच अपुऱ्या तपशिलामुळे सिरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक यांच्या अर्जावर निर्णय घेता आला नाही. या कंपन्यांना पुढील बैठकीआधी संपूर्ण तपशील सादर करण्याची सूचना समितीने केली आहे. त्यानंतर 'कोरोना लस'बाबत निर्णय होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे या डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यत 'कोरोना लस' उपलब्ध होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.

Read More