Marathi News> भारत
Advertisement

धक्कादायक, न्यायाधीशाची पत्नी, मुलाची दिवसाढवळ्या हत्या

 भर दिवसा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांची पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

धक्कादायक, न्यायाधीशाची पत्नी, मुलाची दिवसाढवळ्या हत्या

गुरुग्राम : हरियाणामधील गुरुग्राममध्ये भर दिवसा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांची पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सेक्टर ४९ मध्ये औषध खरेदीसाठी गेलेले असताना सुरक्षारक्षकाने त्यांच्यावर गोळीबार केला. दोघेही गाडीमधून बाहेर पडत असतानाच सुरक्षारक्षकाने दोघांवर गोळीबार सुरु केला.

या खळबळजनक घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोघेही या गोळीबारात जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दोघांचा मृत्यू झाला. 

गुरुग्राम-फरीदाबाद रस्त्यावरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महीपाल (३२) असे आरोपीचे नाव असून मागच्या दोन वर्षांपासून तो या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तैनात होता.

Read More