Marathi News> भारत
Advertisement

Viral Video: 'ती तुझ्याकडे बघून हसली'..मित्रांचं ऐकून केलं प्रपोज, मुलावर चप्पलेनं मार खाण्याची वेळ

Viral Video: काहीजण त्या मुलीला सल्ला देत आहेत. जर तुला तो आवडत नसेल तर स्पष्ट नाही असं सांग. कशाला त्याला मारतेयस असं म्हणत बिचाऱ्या मुलाची कोणीतरी बाजू घेतानाही दिसतंय. दरम्यान मित्रांनी सल्ला दिल्यानुसार 'ती माझ्याकडे हसून बघत होती की बघून हसत होती?' या प्रश्नाचं उत्तर तो मुलगा अजूनही शोधतोय.

Viral Video: 'ती तुझ्याकडे बघून हसली'..मित्रांचं ऐकून केलं प्रपोज, मुलावर चप्पलेनं मार खाण्याची वेळ

Viral Video: सध्या सगळीकडे फ्रेंडशीप डे चं वातावरण आहे. मित्र एकमेकांना फ्रेंडशीप बॅंड बांधत आहेत. एकमेकांसोबतच फोटो सोशल मीडियात शेअर करत आहेत. आपली मैत्री किती घट्ट आहे हे जगाला दाखवून देत आहेत. दरम्यान एका घटनेत शाळेतील मित्राच्या घोळक्याने आपल्याच ग्रुपमधील एका मित्राची खिल्ली उडवली आहे. आपल्याच शाळेतील एका मुलीबद्दल त्याच्या मनात कहाण्या रंगवल्या आणि याचा निकाल भलताच निघाला. 

मुलगी तुझ्याकडे बघतेय, ती तुझ्यावर प्रेम करते असे सांगत आपल्याच मित्राला एका घोळक्याने हरभऱ्याच्या झाडावर चढवले. आपले जवळचे मित्र आपली मस्करी करणार नाहीत, असा ठाम विश्वास त्या मुलाला होता. मित्र जे सांगत होते ती प्रत्येक गोष्ट त्याला खरी वाटत होती. सर्व मित्र मिळून आपली फिरकी घेतायत हे त्याच्या लक्षात आले नाही. 

एक दिवस त्याने आपल्या शाळेतील मैत्रिणीला गाठले आणि तिला प्रपोज केले. ती हो बोलेल असेच त्याला अपेक्षित होते. कारण मित्रांनी तर तशाच प्रकारची माहिती त्याला दिली होती. पण प्रत्यक्षात वेगळाच प्रकार घडला. मुलाने प्रपोज करताच मुलगी चांगलीच संतापली. तिला हा प्रकार अजिबातच आवडला नव्हता. तिने त्याच्या जोरदार कानशीलात लगावली. एवढंच नव्हे तर तिने पायातून चप्पल काढली आणि त्याला मारायला देखील निघाली. मोठ्या मुलींशी कसं वागायचं तुला कळत नाही का? असं ती त्याला विचारायला लागली. यावर तो केवळ सॉरी दीदी असं उत्तर देत राहीला.

लग्नमंडपात नवरी हाताला मेहंदी लावून तयार, नवरा मावस बहिणीला घेऊन फरार

हे सगळं घडत असताना त्याचे मित्र कुठे होते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे मित्र त्याचा व्हिडीओ बनवत होते. आता हा व्हिडीओ सोशल मीडियात खूप व्हायरल होतोय. मित्रांनी स्वत:च्या आनंदासाठी आपल्या मित्राला असं उघड्यावर बेइज्जत केलंय. फ्रेंडशीप डेच्या दिवसातच हा व्हिडीओ समोर आल्याने 'दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा' हे गाणं लोकांना आठवतंय. फ्रेंडशीप गोल पूर्ण झाल्याचे काहीजण म्हणत आहेत. तर 'देव असे मित्र कोणाला देऊ नये' अशी कमेंटही करण्यात आली आहे. 

काहीजण त्या मुलीला सल्ला देत आहेत. जर तुला तो आवडत नसेल तर स्पष्ट नाही असं सांग. कशाला त्याला मारतेयस असं म्हणत बिचाऱ्या मुलाची कोणीतरी बाजू घेतानाही दिसतंय. 

आधी त्याने बॅरिगेट्स तोडले नंतर मागे फिरुन कर्मचाऱ्याला चिरडले, टोलनाक्यावर कारचालकाचा माज व्हिडीओत कैद

दरम्यान मित्रांनी सल्ला दिल्यानुसार 'ती माझ्याकडे हसून बघत होती की बघून हसत होती?' या प्रश्नाचं उत्तर तो मुलगा अजूनही शोधतोय.

Read More