Marathi News> भारत
Advertisement

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! इतके तास बंद रहाणार बँकेच्या सेवा, कारण आणि वेळ माहित करुन घ्या

तुम्ही देखील SBI चे ग्राहक असाल, तर तुम्हाला कोणत्या कालावधीत सेवा बंद राहतील हे देखील माहित असले पाहिजे.

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! इतके तास बंद रहाणार बँकेच्या सेवा, कारण आणि वेळ माहित करुन घ्या

मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI (SBI-State Bank of India) आपल्या ग्राहकांची विशेष काळजी घेते. म्हणूनच बँक आपली सेवा सुधारण्यासाठी पायाभूत सुविधांवर सतत काम करते. स्टेट बँकेने ट्विटद्वारे माहिती दिली आहे. मेंटेनन्स प्रक्रिया या आठवड्यात केली जात आहे, बँकेच्या म्हणण्यानुसार, या कारणामुळे बँकेचे ग्राहक एका विशिष्ट कालावधीत बँकेच्या काही सेवा वापरू शकणार नाहीत.

जर तुम्ही देखील SBI चे ग्राहक असाल, तर तुम्हाला कोणत्या कालावधीत सेवा बंद राहतील हे देखील माहित असले पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्यापूर्वी तुमची महत्त्वाची काम पूर्ण कराल.

सेवा कधी आणि का बंद होईल

भारतीय स्टेट बँकेने एका ट्विटद्वारे ग्राहकांना कळवले की, या आठवड्यात 15 सप्टेंबरला बँकेकडून मेंटेनन्सचे काम सुरू असेल, ज्यामुळे काही बँकिंग सेवा प्रभावित होतील. देखभालीचे काम 15 सप्टेंबर रोजी रात्री 12:00 ते 02:00 दरम्यान सुरू राहील. त्यामुळे सुमारे 120 मिनिटे बँकेचे सर्व कामकाज बंद राहिल.

fallbacks

SBI FD वर अधिक नफा मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस

नवीन योजना सुरू करताना एसबीआयने म्हटले होते, 'स्वातंत्र्याची 75 वी वर्ष साजरी करण्याची वेळ आली आहे. एसबीआयमध्ये मुदत ठेवी आणि विशेष मुदत ठेवींवर विशेष लाभ दिले जात आहेत. ही ऑफर फक्त 14 सप्टेंबर 2021 पर्यंत म्हणजे आजपर्यंत वैध आहे.

एसबीआयने 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान FDशी संबंधित एक विशेष योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, बँकेचे ग्राहक FD मुदत ठेवींवर 0.15 टक्क्यांपर्यंत जास्त व्याज घेऊ शकतात.

एसबीआयने एक विशेष ठेव योजना एफडी किंवा मुदत ठेव ऑफर केली ज्या अंतर्गत सर्व ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज घेता येईल असे सांगितले गेले आहे. एसबीआयच्या वेबसाइटनुसार ही योजना 14 सप्टेंबर रोजी बंद होईल.

जर तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचे झाले तर SBI मध्ये 75 दिवस मुदत ठेवीवर 3.90 टक्के व्याज देते, परंतु विशेष ऑफर अंतर्गत 3.95 टक्के व्याज मिळेल. त्याचप्रमाणे 75 आठवडे किंवा 525 दिवसांच्या मुदत ठेवीवर आता 5 टक्के व्याज उपलब्ध आहे, परंतु विशेष योजनेअंतर्गत 5.10 टक्के व्याज मिळेल.

Read More