Marathi News> भारत
Advertisement

या बॅंकांचे गृहकर्ज महागणार, वाढणार कर्जाचा हप्ता

भारतीय रिझर्व्ह बॅंकच्या चलनविषयक धोरण समिती बैठकीआधी देशातील पहिल्या तीन मोठ्या बॅंकाने आपल्या गृहकर्जात वाढ केली आहे. त्यामुळे या बॅंकांचे गृहकर्ज महागणार आहे.

या बॅंकांचे गृहकर्ज महागणार, वाढणार कर्जाचा हप्ता

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने याचा ताण खिशावर पडला असताना आता गृहकर्जाचा हप्ता फेडण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या आधी देशातील पहिल्या तीन मोठ्या बॅंकांनी आपल्या गृहकर्जात वाढ केलेय. बॅंकानी आपल्या कर्जात ०.१ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे गृहकर्ज महाग झालेय शिवाय कर्जाचा हप्ताही वाढण्यास त्यामुळे मदत झालेय.

गृहकर्ज वाढविलेल्या बॅंकांमध्ये एसबीआय, पीएनबी आणि आयसीआयसीआय या बँकांचा सामावेश आहेत. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने  मुदत ठेवीसाठी ०.१० टक्के व्याजदर वाढविला आहे. स्टेट बँकेने मार्जिनल कॉस्टवर आधारित कर्ज दरांमध्ये (एमसीएलआर) ०.१० टक्के वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यामुळे स्टेट बँकेच्या नव्या ग्राहकांना कर्जांवर अधिक व्याज द्यावे लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ जूनपासून करण्यात येणार असल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. स्टेट बँकेने चालू वर्षात दुसऱ्यांदा 'एमसीएलआर'मध्ये वाढ केली आहे. यापूर्वी बँकेने मार्च महिन्यात 'एमसीएलआर'मध्ये ०.२ टक्के वाढ केली होती. दोनच दिवसांपूर्वी स्टेट बँकेने निश्चित कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती. 

एसबीआयने एक दिवस आणि एक महिना निधी सीमान्त खर्च आधारित कर्ज ७.८ टक्क्यांवरुन७.९  टक्के  केले आहे. तीन वर्षांच्या परिपक्वताच्या कालावधीसाठी कर्जासाठी व्याजदर ८.३५ टक्क्यांवरून ८.३५  टक्क्यांवर वाढला आहे. याच काळात पीएनबीने तीन वर्षे व पाच वर्षांसाठी अनुक्रमे ८.५ टक्के आणि ८.७ टक्के एमसीएलआर वाढविले आहे. पीएनबीने आधार दर ९.१५ टक्क्यांवरून ९.२५ टक्के केला.

तर आयसीआयसीआय बँकेने एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्क्यांवरून पाच वर्षांच्या ८.७० टक्क्यांवर वाढला आहे. तसेच, एक वर्ष आणि तीन वर्षांपर्यंतच्या कर्जासाठी एमसीएलआरला ०.१० टक्के वाढ देण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, इतर बँकाही लवकरच असा निर्णय घेण्याची शक्यता आहे.  बहुतेक गृहनिर्माण आणि वाहन कर्ज एमसीएलआरशी जोडलेले आहेत.

Read More