Marathi News> भारत
Advertisement

SBI ने आपल्या 45 कोटी ग्राहकांना केले सावध! तुम्हीही अशी चुक करू नका

SBIने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

SBI ने आपल्या 45 कोटी ग्राहकांना केले सावध! तुम्हीही अशी चुक करू नका

मुंबई :  तुमच्याकडे किंवा कुटूंबात कोणीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असतील. तर बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. आपल्या 45 कोटी ग्राहकांना SBIने अलर्ट  दिला आहे.

कोरोना काळात नागरिक घरातच राहून व्यवहार करणे पसंत करीत आहेत. त्यामुळे मोबाईलवरून ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशात ऑनलाईन बँकिंगच्या संदर्भातील अलर्ट SBI ने दिला आहे.

 वाढत्या बँकिंग फ्रॉडबाबत SBIचा अलर्ट

 बँकेच्या संदर्भातील डिटेंल्स मोबाईलमध्ये ठेऊ नका.  त्यामुळे तुमच्या बँकेच्या खात्याला धोका निर्माण होऊ शकतो.  

SBIने आपल्या अलर्टमध्ये म्हटलेय की, तुम्ही बँकेचा पीन, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती व त्याचा पासवर्ड, सीव्हीव्ही वेगैरे मोबाईलमध्ये सेव करू नका. त्यामुळे तुमच्या बँकेच्या अकॉऊंटला धोका निर्माण होऊ शकतो.
 
 ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या हँकर्सचा सुळसूळाट सध्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे बँकेचे डिटेंल्स मोबाईमध्ये सेव करू नये. असे तज्ज्ञांचे मत आहे.

Read More