Marathi News> भारत
Advertisement

Base Rate Hike: टेंशन वाढवणारी बातमी! EMI च्या किमती वाढणार... पाहा कोणत्या बॅंकेचे वाढले ईएमआय?

SBI Base Rate and BPLR Hike: सध्या महागाईचे वातावरण आहे त्यातून आता अनेक बॅंका (Bank Rate) या आपल्या कर्जातही वाढ करताना दिसत आहेत. आता एसबीआयनं आपल्या बेस रेट ((Base Rate) आणि बीपीएलआरमध्ये वाढ केली आहे. चला तर पाहूया की नक्की ईएमआय (EMI) वाढणार आहे. 

Base Rate Hike: टेंशन वाढवणारी बातमी! EMI च्या किमती वाढणार... पाहा कोणत्या बॅंकेचे वाढले ईएमआय?

SBI Base Rate and BPLR Hike: सध्या महागाईचे सावट सगळ्यांनाच सतावते आहे त्यातून आर्थिक मंदीही डोकं वर काढते आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकनं (Reserve Bank of India) गेल्या काही दिवसांपासून आपल्या रेपो रेटच्या (Repo Rate) दरात वाढ केली आहे सोबतच अनेक बॅंकांनीही आपले व्याजदर वाढविले आहे. त्यामुळे लोकांना आपले EMI ही जास्त फेडावे लागणार आहेत. त्यामुळे आता भारतीत सर्वात मोठी बॅंक एसबीआय (SBI Bank) आता आपल्या बेस रेटमध्ये आणि बीपीएलआरमध्ये (BPLR) वाढ केली आहे. त्यामुळे तुमच्या ईएमआयमध्येही (EMI Rates) वाढ होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया की नक्की ही वाढ किती आहे आणि त्याचा तुमच्यावर त्याचा परिणाम कसा होईल? नक्की बेस रेट आणि बीपीएलमध्ये म्हणजे काय? आणि त्याच्यामुळे ईएमआय कसे महागार आहे? 

15 मार्चपासून स्टेट बॅंक ऑफ इंडिया आपल्या बेस रेट आणि बेंचमार्क प्राईम लेडिंग रेटमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यातून यावेळी ही वाढ जास्त असावी. यावेळेस 0.70 टक्क्यांनी वाढ केली आहे. 70 बेसिस पॉंईट्सनं ही वाढ झाली आहे. बेंचमार्क प्राईम लेडिंग रेट आणि रेपो रेटनुसार, बॅंक कर्ज देते त्यामुळे आपल्यालाही त्यानूसार कर्ज घ्यावे लागते. सध्या स्टेट बॅंक ऑफ इंडियानं वाढवेलल्या बेस रेट आणि बेंचमार्क प्राईम लेडिंग रेटमुळे जास्तीत ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे आता लवकरच ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. 

बेस रेट म्हणजे काय? 

प्रत्येक बॅंकेचा एक बेस रेट असतो त्यामुळे त्यानुसार बॅंक ही आपल्या कर्जावरील पायाभूत व्याज दर वाढवते. या कर किमान दर असतो त्यातून कर्ज देताना कुठलीही बॅंक ही कर्जदात्याला कमी दरात व्याज देऊ शकत नाही. मागच्या वर्षी स्टेट बॅंक ऑफ इंडियानं बेस रेटमध्ये वाढ केली होती. आजपासून हा रेट 0.70 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे हा रेट 10.10 टक्क्यांनी वाढला आहे.  

27 वर्षातील सर्वाधिक बीपीएलआर

6 सप्टेंबर 1996 नंतर ही सर्वाधिक वाढ आहे. त्यावेळी ही वाढ ही 15.50 टक्के एवढी होती तर हीच आता 10.10 टक्के एवढी आहे. आताचा बीपीएलआर हा 14.35 टक्के आहे. सध्या महागाईच्या पार्श्वभुमीवर हा दर ग्राहकांना पुन्हा चितेंत टाकणार आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांच्याच डोक्यावर महागाईचे वातावरण असताना या बातमीनं लोकांचे टेंशन वाढवले आहे. सध्या हा 27 वर्षातील सर्वात मोठा बीपीएलआर दर आहे. 

 

Read More