Marathi News> भारत
Advertisement

SBI ने एफडी व्याजरात केली वाढ

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयने बुधवारी २८ मार्च रोजी याची घोषणा केली आहे.

SBI ने एफडी व्याजरात केली वाढ

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयने बुधवारी २८ मार्च रोजी याची घोषणा केली आहे.

एसबीआयने केली घोषणा

भारतीय स्टेट बँकेने बुधवारी मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ करण्याचं जाहीर केलं आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार, दोन ते तीन वर्षांपर्यंतच्या आणि एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवर व्याज दरात वाढ केली आहे. ६.५० टक्क्यांवरुन हा व्याज दर आता ६.६० टक्के करण्यात आला आहे.

मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ

तर, तीन ते पाच वर्षांच्या आणि पाच ते १० वर्षांच्या कालावधीसाठी १ कोटीहून कमी मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ केली आहे. दोन्ही व्याज दरात क्रमश: ६.५० टक्क्यांवरुन ६.७० टक्के आणि ६.५० टक्क्यांवरुन ६.७५ टक्के करण्यात आलं आहे.

१ कोटी रुपयांपासून १० कोटींच्या रकमेवर

१ कोटी रुपयांपासून १० कोटी रुपयांपर्यंतच्या एका वर्ष ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी मिळणाऱ्या व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. एक ते दोन वर्षांकरिता अशा रकमेवर सध्याच्या ६.७५ टक्क्यां ऐवजी आता ७ टक्के व्याज देण्यात येणार आहे. 

एसबीआयने महानगर आणि शहरी भागातील ग्राहकांसाठी बचत खात्यात ठेवण्यात येणारी मासिक जमा रक्कम न ठेवल्यास लागणाऱ्या दंडात घट केली आहे. ही रक्कम ५० रुपयांहून घटवून १५ रुपये मासिक, अर्ध-शहरी भगातील ग्राहकांसाठी ४० रुपयांहून १२ रुपये मासिक आणि ग्रामिण क्षेत्रातील ग्राहकांसाठी ४० रुपयांहून १० रुपये मासिक करण्यात आलं आहे

Read More