Marathi News> भारत
Advertisement

SBI Jobs: स्टेट बॅंक ऑफ इंडियात हजारो पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर लिपिकची 8 हजार 283 पदे भरली जातील.  मुंबईसह देशभरातील विविध शहरांमध्ये ही भरती केली जाणार आहे.

SBI Jobs: स्टेट बॅंक ऑफ इंडियात हजारो पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

SBI Clerk Recruitment 2023: बॅंकेत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलेले बहुतांशजण बॅंकेत नोकरी मिळण्याची इच्छा बाळगून असतात. जर तुम्हीदेखील बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर लिपिकची 8 हजार 283 पदे भरली जातील. या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठात अथवा शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. मुंबईसह देशभरातील विविध शहरांमध्ये ही भरती केली जाणार आहे.

SBI लिपिक भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय   20 ते 28 वर्षांदरम्यान असावे. तसेच उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवारांकडून 750 शुल्क घेतले जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कामध्ये सवलत देण्यात आली आहे.

अशी होईल निवड

या पदांसाठी उमेदवारांची निवड विविध टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेच्या आधारे केली जा. या अंतर्गत, जानेवारी 2024 मध्ये प्रिलिम परीक्षा आयोजित केली जाऊ शकते. तर मुख्य परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होऊ शकते. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

SBI लिपिक भर्ती 2023 ची अर्ज प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 7 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. एसबीआय भरतीची प्राथमिक परीक्षा जानेवारी 2024 ला होणार असून मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराला अधिकृत साइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल. 7 डिसेंबर 2023 नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Read More