Marathi News> भारत
Advertisement

दोस्तासाठी काय पण! जीवाची पर्वा न करता सापापासून वाचवलं मित्राला, पाहा थरारक Video

Snake Dog Fight Viral Video: प्राण्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. प्राण्यांची एकमेकांशी असलेली मैत्री पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. साप हा सर्वात विषारी प्राणी म्हणून गणला जातो. त्यामुळे त्याच्या वाटेला सहसा कोणी जात नाही. असाच एका सापाच्या शिकारीचा व्हिडीओ (Snake Hunting Video) समोर आला आहे.

दोस्तासाठी काय पण! जीवाची पर्वा न करता सापापासून वाचवलं मित्राला, पाहा थरारक Video

Snake Dog Fight Viral Video: प्राण्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. प्राण्यांची एकमेकांशी असलेली मैत्री पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. साप हा सर्वात विषारी प्राणी म्हणून गणला जातो. त्यामुळे त्याच्या वाटेला सहसा कोणी जात नाही. असाच एका सापाच्या शिकारीचा व्हिडीओ (Snake Hunting Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पक्षी, कुत्रा (Dog) आणि साप दिसत आहे. साप पक्ष्यांच्या पिंजऱ्यात घुसून शिकारीचा प्रयत्न करतो. जीव वाचवण्यासाठी मित्र येणार नाही असं कसं होईल. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. एक साप पक्ष्यांच्या पिंजऱ्यात घुसण्याचा प्रयत्नात असतो. नेमकं तेव्हाच पिंजऱ्यातील पक्षी बचावासाठी किलबिलाट करताना दिसतात. 

कुत्र्याच्या ही बाब लक्षात येते आणि धाव घेतो. तिथे पोहोचतो आणि सापाची शेपटी तोंडात पकडतो आणि खेचतो. विषारी साप आपल्याला चावेल याची जराही पर्वा कुत्रा करत नाही आणि सापाला खेचत बाहेर नेतो. साप त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या मित्राला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावतो.हा व्हिडीओ अरविंद कुमार नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आहेत. तसेच व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका युजर्सने लिहिलं आहे की, ज्याने वाचवलं तो कुत्रा आहे आणि ज्याने व्हिडीओ बनवला तो माणूस आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "आशा आहे की, सापाला काहीच झालं नसेल"

Read More