Marathi News> भारत
Advertisement

महाराष्ट्र सरकार जा 'रिया' है- सुशांत प्रकरणावरुन भाजप नेते संबित पात्रांची टीका

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची महाविकासआघाडीवर टीका

महाराष्ट्र सरकार जा 'रिया' है- सुशांत प्रकरणावरुन भाजप नेते संबित पात्रांची टीका

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सीबीआय तपासाला कोर्टाने मंजुरी मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते संबित पात्रा यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र सरकार लवकरच पडणार असल्याचे संकेत संबित पात्रा यांनी दिले आहेत.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून शब्दांमधून महाविकासआघाडीवर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, 'हा न्यायाचा विजय आहे. सुशांतसिंह राजपूत अतिशय उत्कृष्ट कलाकार होता. अशाप्रकारे त्याच्या निघून जाण्याने संपूर्ण देश दु:खी आहे. संपूर्ण देशाला न्यायाची अपेक्षा होती. संपूर्ण देश या दिवसाची प्रतीक्षा करत होता. आता प्रामाणिकपणे चौकशी केली जाईल आणि दोषींना शिक्षा होईल.'

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, सुशांतसिंह राजपूतचे वडील आणि बहिणींनी जे धैर्य दाखवलं आणि सुशांतच्या आत्म्यास न्याय मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला, तो देखील एक ऐतिहासिक क्षण आहे. मी सुशांतच्या परिवारास अभिवादन करू इच्छित आहे.'

Read More