Marathi News> भारत
Advertisement

Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकी उद्धव ठाकरे गटाचं 'मशाल' चिन्ह जाणार?

निवडणूक आयोगाने (Election Comission) ठाकरे गटाला काही दिवसांपूर्वी  मशाल (Mashal) हे नवं चिन्ह दिलं होतं.

Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकी उद्धव ठाकरे गटाचं 'मशाल' चिन्ह जाणार?

मुंबई : राजकीय वर्तुळातून (Political News) या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का देणारी बातमी आली आहे. निवडणूक आयोगाने (Election Comission) काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला मशाल (Mashal) हे नवं चिन्ह दिलं होतं. मात्र या विरोधात समता पार्टी (Samta Party) दिल्लीतील उच्च न्यायालयात (High Court) जाणार आहे. (samata partys demand not to give mashal symbol to shiv sena hearing in high court tomorrow)

उच्च न्यायालयात उद्या शनिवार 15 ऑक्टोबरला मशाल वादावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. समता पार्टी आपली बाजू मांडणार आहे. ठाकरे गटाला मशान चिन्ह न देण्याची समता पार्टीची मागणी आहे. 

निवडणूक आयागाने ठाकरे गटाला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) मशाल हे चिन्ह दिलं आहे. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीआधीच ठाकरे गटाला मशाल चिन्ह गमावावं लागणार की न्यायालय दिलासा देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.

अंधेरीत भाजप विरुद्ध ठाकरे

दरम्यान अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे मुरजी पटेल विरुद्ध ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यात मुख्य सामना होणार आहे. या दोन्ही उमेदवारांनी आज शुक्रवारी मोठं शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. मात्र आता उच्च न्यायालय मशाल या चिन्हाबाबत काय निर्णय देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read More