Marathi News> भारत
Advertisement

इतिहासात पहिल्यांदाच... रुपया घसरला, ७०.५०₹ प्रति डॉलर!

रुपयांचं मूल्य घसरलं तर पेट्रोल, डिझेल सहीत अनेक वस्तूंच्या किंमतींत वाढ होऊ शकते

इतिहासात पहिल्यांदाच... रुपया घसरला, ७०.५०₹ प्रति डॉलर!

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळतेय. रुपया आत्तापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर पोहचलाय. करन्सी मार्केटमध्ये ट्रेड दरम्यान मूल्यात ४२ पैशांची घसरण होऊन पहिल्यांदाच रुपया ७०.५२ वर दाखल झालाय. डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी २२ पैशांच्या घसरणीसहीत ७०.३२ नं खुला झाला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, रुपयाचं मूल्य आणखीन खाली घसरण्याची शक्यता आहे. काल बाजारात रुपयांच्या मूल्यात थोडाफार दिलासा दिसला होता. ६ पैशांच्या बढतीसोबत रुपया ७०.१० च्या स्तरावर बंद झाला होता. परंतु, बुधवारी पुन्हा एकदा रुपया घसरला. 

आत्तापर्यंतचा रुपयांचं निच्चांकी मूल्य ७०.४० प्रति डॉलरची नोंद होती. १६ ऑगस्ट रोजी रुपयाचं हे मूल्य नोंदवण्यात आलं होतं. परंतु, आज हादेखील रेकॉर्ड तुटलाय. 

रुपयांचं मूल्य घसरलं तर पेट्रोल, डिझेल सहीत अनेक वस्तूंच्या किंमतींत वाढ होऊ शकते. त्यामुळे सामान्यांना महागाईला सामोरं जावं लागू शकतं. 

रुपयांच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यानं आयटी, फार्मा, ऑटोमोबाईल सेक्टरला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांसारख्या आयटी कंपन्यांसहीत यूएस मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या फार्मा कंपन्यांना याचा फायदा होईल. तसंच ओएनजीसी, रिलयान्स इंडस्ट्रीज, ऑईल इंडिया लिमिटेड यांसारख्या गॅस निर्मात्या कंपन्यांनाही डॉलरच्या मजबुतीनं फायदा होईल. कारण, या कंपन्या 'डॉलर'मध्ये इंधन विक्री करतात.


 

Read More