Marathi News> भारत
Advertisement

चोराने भर मंडपातून पैसे ,दागिने न्हवे तर..बाप्पाच्या मूर्तीवरून चोरलं असं काही की.. Video एकदा पाहा

चोरी करताना हा चोर cctv मध्ये दिसलाय. चोराने कुठलेही पैसे किंवा दागिने नाही तर बाप्पाच्या....

चोराने भर मंडपातून पैसे ,दागिने न्हवे तर..बाप्पाच्या मूर्तीवरून चोरलं असं काही की.. Video एकदा पाहा

ROBBERY IN GANPATI PANDAL CCTV FOOTAGE: सध्या एका गणपती मंडपातील चोरीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडीओ खूप लोकांनी पाहिलंय आणि शेअर केला जात आहे.

सध्या सगळीकडे गणपतीची धामधूम आहे सगळीकडे मोठमोठे मंडप ,गणपती बाप्पा ,आरत्या सर्व वातावरण अगदी प्रसन्न आहे.

पण अशावेळी सुद्धा काही समाजकंटक सक्रिय होतात. गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणं ,भाविकांचे पैसे दागिने चोरणं,इतकंच काय तर देवाला सुद्धा सोडलं जात नाही,देवाचे दागिने सुद्धा चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत ..

पण यावेळी काहीतरी वेगळंच घडलय यावेळी चोरावर राग नाही तर प्रेम व्यक्त केलं जात आहे .  

हा व्हिडीओ तेलंगणा मधील असल्याच सांगितलं जात आहे .चोरी करताना हा चोर cctv मध्ये दिसलाय. चोराने कुठलेही पैसे किंवा दागिने नाही तर बाप्पाच्या हातात असणाऱ्या मोदकावर डल्ला मारलाय

बाप्पाच्या हातात प्रसाद म्हणून जो मोदक ठेवण्यात आला होता तो घेऊन या व्यक्तीने पोबारा केला आहे

या व्हिडिओवर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडतोय आणि मोदक चोरणाऱ्या या व्यक्तीला सगळेच सहानुभूती देताना दिसत आहेत 

 

Read More