Marathi News> भारत
Advertisement

४ मे नंतर तिन्ही झोनमध्ये काय बंद राहणार काय खुले होणार ?

रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार वर्गीकरण

४ मे नंतर तिन्ही झोनमध्ये काय बंद राहणार काय खुले होणार ?

नवी दिल्ली : भारतात लॉकडाऊन आणखी २ आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशभरात १७ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार आहे. गृहमंत्रालयानं पत्रक प्रसिद्ध करुन लॉकडाऊनच्या काळातील मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत.

१. रेड झोन

सायकल रिक्षा, ऑटो. टॅक्सी, कॅब, बसेस, पान दुकान, सलून आणि स्पा. बंद राहणार

२ ऑरेंज झोन

वाहतूक व्यवस्था बंद असेल. फक्त कॅबची सुविधा सुरू असेल. एका गाडीत दोन व्यक्तीला प्रवास करता येईल. १ चालक आणि २ प्रवासी.

३. ग्रीन झोन 

बसेस चालतील. परंतु बसेसची क्षमता ५० टक्के पेक्षा जास्त नसावी. डेपोमध्ये पण ५० टक्केच कर्मचारी असावेत. सलून खुले राहतील. चित्रपटगृह, मॉल, स्पोर्टस कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी नाही. खबरदारी घेत उद्योग सुरू राहतील.
ग्रीन झोनमध्ये मद्य विक्री सुरू राहील. परंतु सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवनाला परवानगी नाही.

कोणती सूट 

- खाजगी कंपन्यांत ३३ टक्के कर्मचारी असावेत.
- शहरी भागात बांधकामासाठी परवानगी. परंतु तिथेच कामगार उपलब्ध असावेत. बाहेरून कामगार आणता येणार नाही.

तिन्ही झोनमध्ये पुढील गोष्टी बंद राहणार 

- रेल्वे, मेट्रो, विमान सेवा बंद राहणार
- चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, जिम, स्वीमिंग पूल, पार्क बंद राहणार
- सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक स्थळ बंद राहणार

Read More