Marathi News> भारत
Advertisement

तब्बल 8,091 मीटर उंच अन्नपूर्णा शिखरावरून गिर्यारोहक बेपत्ता; सापडला तेव्हा...

Mount Annapurna हे जगातील सर्वाधिक उंचीच्या पर्वतशिखरांपैकी एक. दरवर्षी हे शिखर सर करण्यासाठी जगातून अनेक गिर्यारोहक इथं येतात. पण, ही आव्हानात्मक चढाई पूर्ण करणं अनेकांनाच शक्यही होत नाही. काही दिवसांपूर्वी एक भारतीय गिर्यारोहकही तिथं गेला आणि...   

तब्बल 8,091 मीटर उंच अन्नपूर्णा शिखरावरून गिर्यारोहक बेपत्ता; सापडला तेव्हा...

Indian Mountaineer Anurag Maloo: जगातील उंचच उंच शिखरं सर करणारे अनेक गिर्यारोहक (Mountaineer) तुम्ही पाहिले असतील. त्यांच्या प्रवासवर्णनांचा थरारही अनुभवला असेल. किंबहुना तुम्ही चित्रपटांच्या माध्यमातूनही हे गिर्यारोहणाचं क्षेत्र नेमकं कसं असतं याची झलक पाहिली असेल.

मुळात हे सर्वकाही समोरून पाहणं आणि प्रत्यक्षात अनुभवणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण, प्रत्यक्षात हे सारं अनुभवत असताना क्षणात नेमकं काय घडेल याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. बदलणारं हवामान, कठीण चढाई, शरीराची साथ असे अनेक घटक यावेळी महत्त्वाची भूमिका निभावत असतात आणि एखादी लहाशी चूक इथं तुम्हाला संकटाच्या दरीत लोटू शकते. अगदी मृत्यूच्याही दरीत! 

'त्यानं' मृत्यू जवळून पाहिला... 

मागील आठवड्यात (Rajasthan) राजस्थानमधील एक व्यावसायिक असणारा 34 वर्षीय अनुराग मालू (Nepal) नेपाळमध्ये असणाऱ्या जगातील सर्वाधिक उंचीच्या शिखरांपैकीच एक अशा अन्नपूर्णा शिखराच्या चढाईसाठी गेला होता. त्याचवेळी कँप 4 वरून कँप 3 पर्यंत येत असताना तिसऱ्या कँपखाली असणाऱ्या एका हिमदरीत तो कोसळला. 

सदरील गिर्यारोहण उपक्रम आयोजन करणाऱ्या संस्थेशी संलग्न एका अधिकाऱ्यानं माध्यमांना याबाबतची माहिती दिली. 8 हजार मीटरहून अधिक उंचीच्या 14 शिखरांवर चढाई करण्याच्या मोहिमेसाठी अनुराग निघाला होता. पण आरईएक्स करम-वीर चक्रनं सन्मानित या गिर्यारोहकाच्या नशिबात मात्र काही वेगळंच लिहिलं होतं. 

हेसुद्धा वाचा : Russia-Ukraine War: घोडचूक! रशियाकडून स्वत:च्याच शहरावर हल्ला; स्फोटामुळं हाहाकार!

एक अनुभवी गिर्यारोहक असूनही अनुराग अन्नपूर्णा शिखर उतरताना संकटाच्या नव्हे, तर मृत्यूच्या दरीत कोसळला होता. भारतीय शासनापर्यंत ही माहिती पोहोचली आणि त्याचा शोध घेण्याच्या मोहिमेला वेग आला. कुटुंबीय आणि मित्रपरिवार प्रचंड चिंतेत असतानाच तिथं यंत्रणांनी यामध्ये जातीनं लक्ष घातलं आणि इतक्या दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर अनुराग गुरुवारी सापडला, तो श्वास घेत होता. 

'तो हयात आहे... सध्या त्याची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्याच्यावर तातडीनं उपचार सुरु करण्यात आले आहेत' अशी माहिती अनुरागच्या भावानं वृत्तसंस्थेला दिली आणि सर्वांच्याच जिवात जीव आला. 

अन्नपूर्णा शिखराविषयी थोडं... 

नेपाळमध्ये असणारं माऊंट अन्नपूर्णा हे जगातील दहाव्या क्रमांकाचं उंच शिखर आहे. पर्वतशिखरांची चांगली ओळख असूनही अनेक गिर्यारोहकांसाठी अन्नपूर्णा सर करताना वाटेत बरेच अडथळे येतात. इथं असणारा हवेचा मारा आणि क्षणात बदलणारं हवामान हे आजवर सातत्यानं गिर्यारोहकांच्या मोहिमांमध्ये अडथळे निर्माण करताना दिसलं आहे. 

Read More